Shops Caught Fire: पुणे सातारा रस्त्यावरील आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान; दोन नागरिक जखमी

By

Published : May 1, 2023, 9:28 AM IST

thumbnail

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील डी मार्ट नजीक असलेल्या 3 दुकानांमधे भीषण आग लागली. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास घडली. या आगीत दोन नागरिक जखमी झाले आहे. यामध्ये एकजण दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली असून धोका दूर करण्यात आला आहे. अग्निशामक दलाला सातारा रस्त्यावर डी मार्ट नजीक मध्यरात्री 2 वाजून 22 मिनिटांनी काही दुकानांना आग लागल्याची बातमी मिळाली होती. अग्निशामक दलाकडून 6 फायरगाड्या 2 वॉटर टँकर आणि 01 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या. यावेळी घटनास्थळी 3 दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यात दुकान होम अप्लायन्स, दुकान किचन अप्लायन्स व दुकान मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या. या ठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली आहे. भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले आहे. यामध्ये एक दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली आहे.  

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.