Singer Lata Mangeshkar : लतादीदींना साताऱ्यात शब्दसुरांची आदरांजली

By

Published : Feb 8, 2022, 6:22 PM IST

thumbnail

सातारा : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांना सोमवारी साताऱ्यातील रंगकर्मींतर्फे शब्दसूरांची आदरांजली वाहण्यात आली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन (Lata Mangeshkar passed away on Sunday) झाले. त्यानिमित्त सोमवारी साताऱ्याची रंगपंढरी समजल्या जाणा-या शाहूकला मंदिरात शहरातील रंगकर्मी जमले होते. प्रारंभी लतादीदींच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात (Tribute was paid to Latadidi) आली. त्यानंतर रुपेश गौंड, आरती गौंड, शशांक वाडेकर यांनी 'एक प्यार का नगमा है, छुपगये सारे नजारे, अच्छा तो हम चलते है, अखीयों के झरोके से, ए मेरे वतन के लोंगो, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशी लता मंगेशकर यांच्या आवाजाने अजरामर झालेली गिते म्हणत लतादीदींना स्वरांजली अर्पण केली. यावेळी बाळकृष्ण शिंदे, कल्याण राक्षे, राजीव मुळ्ये, संतोष पाटील, प्रसाद नारकर, किरण पवार, विकास बनकर, नितीन देशमाने, यशवर्धन आवळे, राहूल घोरपडे, जयदेव भालेराव, प्रशांत इंगवले, रविना गोगावले, अमोल जोशी आणि श्री. उंबरकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.