Video : पनवेल शहरातील मिर्ची गल्लीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

By

Published : Mar 12, 2022, 11:49 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail

नवी मुंबई - जुन्या पनवेल शहरातील एमजी रोडवर असणाऱ्या मिर्ची गल्लीतील एका घराला भिषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा 11.40 च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या घराच्या खालील गाळयात थर्माकॉल तसेच लग्न सराईत लागणाऱ्या साहित्याचे दुकान होते त्यामुळे आगीने त्वरित पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.