Ram Charan upasana baby girl :'मेगा प्रिन्सेस'च्या भेटीसाठी अल्लू अर्जुन हॉस्पिटलमध्ये, नात भाग्यवान असल्याचे चिरंजीवींचे मत

By

Published : Jun 20, 2023, 4:23 PM IST

Updated : Jun 22, 2023, 8:00 PM IST

thumbnail

हैदराबाद - तेलगू सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांनी मंगळवारी सकाळी एका बाळाचे स्वागत केले. घरी लहान भाळाचे आगामन होणार असल्याने राम चरणच्या प्रतिष्ठित फिल्मी कुटुंबात उत्साह आणि आनंदाची लहर निर्माण झाली आहे तर चाहत्यांना आनंद झाला आहे. राम चरणचा चुलत भाऊ आणि अभिनेता अल्लू अर्जुन यानेही त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिच्यासह नवीन आई बाबा झालेल्या राम चरण आणि उपासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि नवजात बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात भेट दिली. अल्लु अर्जुनने पत्नीसह भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर  मेगा प्रिन्सेस (#MegaPrincess ) हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. दरम्यान, राम चरणचे सुपरस्टार वडील चिरंजीवी यांनी रुग्णालयाबाहेर मीडियाशी संवाद साधला आणि आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला. तेलुगुमध्ये माध्यमांशी बोलताना, चिरंजीवीने सांगितले की नवजात बाळाचे आगमन हे कुटुंबासाठी भाग्यवान आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबात अनेक चांगल्या घटना घडत आहेत. त्यामुळे आनंद सजरा करण्यासाठी हे निमित्य पुरेसे आहे.

Last Updated : Jun 22, 2023, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.