Murder In Jalna : तीक्ष्ण हत्याराने वार करून जालन्यात तरुणाची हत्या, बारवले महाविद्यालय जवळील घटना

By

Published : Dec 19, 2021, 5:33 PM IST

thumbnail

जालना : जालना शहरात 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात ( Youth Murder in Jalna ) आलीय. शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाजवळ ( Badrinarayan Barwale Highschool Jalna ) ही घटना आज सकाळी उघडकीस आलीय. तौफिक उर्फ राहील खान असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाच नाव आहे. तो शहरातील लालबाग परीसरातील ( Lalbaug Area In Jalna ) रहिवासी आहे. या खूनामागील कारण अस्पष्ट असून, या तरुणाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आलीय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी (Chandanzira Police Station ) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. घटनास्थळी पोलिसांना फुटलेला मोबाईल सापडला असून, हा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.