VIDEO नदीत वाहून जाणाऱ्या हत्तीला वाचविताना बचाव पथकाची बुडाली बोट; थरकाप आणणारी दृश्ये

By

Published : Sep 25, 2021, 8:43 PM IST

thumbnail

भुवनेश्वर - मुंडलीजवळील महानदीत अडकलेल्या हत्तीची सुटका करताना ओडीआरएएफच्या टीमची बोट पाण्यात बुडाली. तस्करांनी हल्ला केल्याने ओडीआरएएफची टीम मृत्यूच्या दाढेत अडकली. अखेर महत्प्रयासाने त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुत्राच्या माहितीनुसार दोन माध्यम प्रतिनिधींसह ओडीआरएएफच्या टीममधील चार सदस्यांची बोट ही नदीत वाहून गेली होती. या बोटमधून टीम ही मुंडली पुलाजवळ अडकलेल्या हत्तीची नदीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी कॅमेरामनकडून कॅमेरा वाचविण्याची धडपडही व्हिडिओमध्ये चित्रित झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.