VIDEO : राणा दाम्पत्याची कृती विकृत मनोवृत्तीची; रुपाली चाकणकर यांची नागपुरात टीका

By

Published : May 14, 2022, 12:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

thumbnail

नागपूर - एकीकडे महाराष्ट्र कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडत आहे. या परिस्थितीत महागाई, बेरोजगारी, असंघटित कामगार असे अनेक प्रश्न असताना खासदार नवनीत राणा यांनी पुढे येणे गरजेचे होते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला काही आर्थिक मदत आणून देणे गरजेचे होते. मात्र, नवनीत राणा हनुमान चालिसा पठण करत आहेत. एकसंध आणि शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचा हा प्रयत्न आहे. ही विकृत मनोवृत्ती आहे, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नागपुरात केली. राणा दाम्पत्य जे विचार मांडत आहेत, तो महाराष्ट्राच्या माणसाचा विचार नसल्याचेही त्या म्हणाल्या. कवयित्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका नक्कीच निंदनीय आहे. प्रत्येक संकट काळामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला मदत केली आहे, योगदान दिले आहे. केलेली टीका अशोभनीय आणि निंदनीय असल्याचेही त्या म्हणाल्या.

Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.