Cow Feed Milk To Pig गोमातेची माया, डुकराला पाजले दूध पाहा व्हिडीओ

By

Published : Sep 30, 2022, 8:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

Cow Feed Milk To Pig अहमदनगर, गाईने वासराला, हरणाला, मांजरीला, लहान बाळांना दूध पाजून Cow Milk उदारता दाखवत आपले मातृत्व सिद्ध केले असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र कोपरगाव शहरात चक्क डुकारालाही दूध पाजून तिने cow milked the pig पुन्हा एकदा मातृत्वाची उदारता दाखवून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील कापड बाजार भागात ब्राह्मण गल्लीत नेहमीप्रमाणे दररोज गाई, गोऱ्हे, बैल येऊन बसत असतात. त्यातील एका गाईचे एका डुकराने मनसोक्त दूध पित असल्याचे नुकतेच पहावयास मिळाले आहे. काल सकाळच्या सुमारास या गोमातेने प्रतिकार न करता त्या डुकराला आपले दूध पिऊ दिले. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनेकांनी अनुभवला व पाहून आश्चर्य व्यक्त केले. मागील काही महिन्यांपूर्वी कोपरगावातील येवला रोड भागात चक्क डुकरिणीने मेलेल्या कुत्रीच्या पिलांना आपले दूध पाजले होते. प्राणी एकमेकांचे कितीही शत्रू असले, किंवा भिन्न प्रजातीचे असले, तरी एकमेकांबद्दल ते आपुलकी व सहानुभूती दाखवत असतात. एकीकडे माणुसकी लोप पावत असतांना दुसरीकडे प्राणी मात्र वारंवार आपले कर्तव्य पार पडतांना दिसत आहे. याचा आपण आदर्श घेणे गरजेचे बनले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.