BJP Agitation Malik Resignation : नवाब मलिकांच्या अटकेसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन

By

Published : Feb 24, 2022, 7:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

thumbnail

मुंबई - नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप निदर्शने करणार आहे अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. (BJP Agitation Malik Resignation) कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार साहेब नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही असही पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.