ETV Bharat / sukhibhava

World Handwashing Day 2023 : 'ग्लोबल हँडवॉशिंग डे' 2023; जाणून घ्या काय आहे उद्देश आणि इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 1:58 PM IST

World Handwashing Day 2023 : दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी 'जागतिक हात धुणे दिवस' साजरा केला जातो. जगभरातील सर्व वयोगटातील लोकांना साबणाने योग्य हात धुण्याच्या फायद्यांविषयी जागरूक करणे, हा उद्देश्य आहे. लोकांना हात धुण्याची अत्यंत महत्त्वाची सवय म्हणून अंगीकारण्यास प्रवृत्त करणे हा या दिवसाचा उद्देश असतो.

World Handwashing Day 2023
ग्लोबल हँडवॉशिंग डे 2023

हैदराबाद : World Handwashing Day 2023 साबणाने हात धुण्याचे फायदे जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहे. पण असे असूनही अनेक लोक या सवयीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. हात स्वच्छ आणि जंतूमुक्त ठेवण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत. तथापि, कोविड 19 पासून, आपले हात स्वच्छ आणि जंतूमुक्त ठेवण्यासाठी साबणाने योग्य प्रकारे हात धुणे आवश्यक आहे. याविषयी लोकांमध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच वेळी, बऱ्याच लोकांनी नियमित अंतराने आणि गरजेनुसार हात धुण्याची सवय त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनविली आहे. मात्र याबाबत अजून प्रयत्न करण्याची आणि जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे.

लोकांना साबणाने नियमित आणि योग्य प्रकारे हात धुण्याची सवय लावून घेण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी 'ग्लोबल हँडवॉशिंग'चे आयोजन केले जाते. केवळ संसर्ग आणि इतर रोग टाळता येण्यासारखे नाही तर चांगला आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक हात धुणे दिवस 2023 “स्वच्छ हात आवाक्यात आहेत” या थीमवर साजरा केला जात आहे.

इतिहास आणि उद्देश : लोकांना साबणानं हात धुण्यास प्रोत्साहित करणे आणि त्याचे फायदे माहित करून देण्याकरिता ग्लोबल हँडवॉशिंग पार्टनरशिपद्वारे ग्लोबल हँडवॉशिंग डेची स्थापना करण्यात आली आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक हात धुवा' दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगातील सुमारे ७० देशांतील १२० दशलक्ष मुले साबणाने हात धुताना दिसले.

हात धुणे महत्वाचे का आहे ? डॉ. राजेश शर्मा, जनरल फिजिशियन, भोपाळ सांगतात की, बहुतेक प्रकरणांमध्ये, आपल्या हातांमुळे व्हायरल किंवा इतर संसर्ग शरीरात प्रवेश करतात. ते स्पष्ट करतात की, आपले हात जिवाणू किंवा विषाणूंच्या संपर्कात येतात आणि संसर्गास प्रथम जबाबदार असतात. अशा परिस्थितीत आपण हात न धुता काहीही खाल्लं किंवा नाक, डोळे किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श केला तर जिथून जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. तर आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

हात नीट धुण्याची सवय : ते म्हणतात की सामान्यतः लोकांना असे वाटते की, मुलांमध्ये साबणाने योग्य प्रकारे हात धुण्याची सवय लावणे सर्वात महत्वाचे आहे. केवळ लहान मुलांनीच नाही तर सर्व वयोगटातील प्रौढांनी देखील शौचास केल्यानंतर किंवा अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर हात धुवावेत. बाहेरून घरात आल्यानंतर आणि घरातील किंवा कार्यालयातील विविध प्रकारच्या वस्तू आणि पृष्ठभागांना स्पर्श केल्यानंतरदेखील हात धुणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन दिनचर्येतही आणि नियमित अंतराने साबणाने हात धुण्याची सवय असावी. ते म्हणतात की सध्याच्या काळात दररोज कोणत्या ना कोणत्या संसर्गाच्या किंवा रोगाचा प्रसार झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत संसर्ग झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आधीच संसर्ग टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे चांगले असते.

हेही वाचा :

  1. World Day Against Speciesism 2023 : प्रजातीवाद विरुद्ध जागतिक दिवस 2023, हा दिन साजरीमागे करण्यामागे जाणून घ्या संकल्पना
  2. Combat Desertification and Drought 2023 : वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिवस 2023 चा इतिहास आणि महत्त्व
  3. World Day Of The Deaf : जागतिक कर्णबधिर दिन 2023; जाणून घ्या या दिनाचा उद्देश आणि थीम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.