ETV Bharat / sukhibhava

World Egg Day 2023 : जागतिक अंडी दिन 2023; या दिनानिमित्त जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य वेळ...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 12:51 PM IST

World Egg Day 2023 : दरवर्षी जागतिक अंडी दिन ऑक्टोबरच्या दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तसेच आजच्या या दिनानिमित्त जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य वेळ काय आहे, हेदेखील समजून घेऊयात.

World Egg Day 2023
जागतिक अंडी दिन 2023

हैदराबाद : अंडी केवळ आरोग्यासाठीच चांगली नसतात तर त्यामध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात. दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शुक्रवारी 'जागतिक अंडी दिन' साजरा केला जातो. अशा परिस्थितीत हा दिवस का साजरा केला जातो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

जागतिक अंडी दिनाचा इतिहास : अंड्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 1996 मध्ये प्रथमच व्हिएन्ना IEC परिषदेत जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. हा दिवस अंड्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि अंड्यांचं संरक्षण करण्याची गरज लोकांना सांगण्यासाठी साजरा केला जातो. अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे शरीरासाठी तर उपयुक्त आहेतच पण अंडी हृदयासाठीही खूप उपयुक्त आहे. अंड्यामुळे रक्तातील एलडीएल प्रोटीनची पातळी वाढू शकते. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठीही याचा उपयोग होतो. अंड्याचं सेवन केल्यानं वजन आणि कोलेस्टेरॉल तर नियंत्रित राहतेच पण स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं. दरवर्षी जागतिक अंडी दिनानिमित्त एक थीम निश्चित केली जाते. 'निरोगी भविष्यासाठी अंडी' ही यंदाच्या वर्षीची थीम आहे.

अंडी खाण्याची योग्य वेळ : अंडी सकाळी खावीत. सकाळी नाश्त्यासोबत उकडलेलं अंड खाल्ल्यानं दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. अंडी खाल्ल्यानं व्यक्तीचं मन आणि शरीर दिवसभर सक्रिय राहतं. बाजारात दोन प्रकारची अंडी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये एक देशी, तर दुसरा परदेशी आहे. खरं तर शेतातील अंडी खाण्यापेक्षा स्थानिक अंडी खाणं अधिक फायदेशीर आहे.

अंडी प्रोटीनची कमतरता दूर करतात : सध्या प्रोटीन सप्लिमेंट्सची मागणी वाढत आहे. लोक बाजारातून महागडे प्रोटीन सप्लिमेंट्स विकत घेत आहेत आणि सेवन करत आहेत. आहारात अंड्याचा समावेश केल्यास शरीराला भरपूर प्रथिनं मिळतात. हे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

हाडे देखील मजबूत होतात : अंड्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वं असली तरी अंड्यांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळतं. अंडी खाल्ल्यानं व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होते. व्हिटॅमिन डी हाडांसाठी फायदेशीर आहे, ते हाडांच्या दुखण्यापासून आराम देतं.

डोळ्यांसाठी देखील फायदेशीर : आजच्या युगात लहान मुलं आणि वृद्ध लोकांमध्ये डोळ्यांचा त्रास सामान्य झाला आहे, लहान मुलेही चष्मा लावतात. यामागील मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईची कमतरता. अंडी खाल्ल्यानं शरीरात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता होत नाही. त्याचवेळी अंड्यांमध्ये आढळणारं सेलेनियम डोळ्यातील मोतीबिंदूशी लढण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं.

हेही वाचा :

  1. Egg Alternative : अंडी खात नाही का? मग तुम्ही हे अन्न खाऊ शकता...
  2. Egg vs Milk : प्रोटीनसाठी काय चांगले अंडे की दूध, घ्या जाणून....
  3. Egg Benefits For Hair : केसांना अंडी लावण्याचे आहेत अनेक फायदे; कोंडा दूर होण्यास होते मदत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.