ETV Bharat / sukhibhava

'जागतिक एड्स दिन' 2023; जाणून घ्या यावर्षीच्या 'जागतिक एड्स दिना'ची थीम आणि इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 1:06 PM IST

Updated : Dec 1, 2023, 8:58 AM IST

World AIDS Day 2023 : 'जागतिक एड्स दिन' दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या वर्षीची थीम 'लेट कम्युनिटीज लीड'चे उद्दिष्ट एड्सनं बाधित समुदायांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करणं आहे.

World AIDS Day 2023
जागतिक एड्स दिन 2023

हैदराबाद World AIDS Day 2023 : 'जागतिक एड्स दिना'निमित्त समाजात सर्व वयोगटातील लोकांना एचआयव्ही संसर्गाबाबत जागरुक केलं जातं. याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना 'जागतिक एड्स दिना'निमित्त एक थीम सेट करते, यामध्ये यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं 'जागतिक एड्स दिना'ची थीम 'Let Communities Lead' ठरवली आहे. 'जागतिक एड्स दिन' दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वप्रथम 1988 मध्ये 'जागतिक एड्स दिना'ची सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस एचआयव्ही/एड्सबद्दल जागरुकता पसरवणं आणि या आजारानं बाधित लोकांना मदत करणं हा आहे.

या वर्षीच्या 'जागतिक एड्स दिना'ची थीम काय आहे? : या वर्षीच्या 'जागतिक एड्स दिना'ची थीम, 'लेट कम्युनिटीज लीड', एड्सनं बाधित समुदायांना नेतृत्व भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. ही थीम एड्सनं बाधित झालेल्या लोकांना आवाज उठवण्यास आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी कृती करण्यास सक्षम असण्याची गरज अधोरेखित करते. एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. जेणेकरुन WHO नुसार या थीमचा उद्देश पूर्ण होऊ शकेल.

'जागतिक एड्स दिन' का साजरा केला जातो? : 'जागतिक एड्स दिना'चं उद्दिष्ट एचआयव्ही / एड्सबद्दल जागरुकता पसरवणं आणि जगभरातील या आजारानं बाधित लोकांना मदत करणं हा आहे. एड्सनं बाधित लोकांना समाजात कलंक आणि भेदभाव न करता सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता यावं, हा या दिवसाचा उद्देश आहे. त्यांच्यावरील अस्पृश्यतेचा भेदभाव संपवला पाहिजे. नवीन औषधांसह उपचारातील सुधारणांना पाठिंबा देणं आणि HIV/AIDS मुळे बाधित सर्व लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध आहेत, याची खात्री करणं हे देखील या दिवसाचं उद्दिष्ट आहे.

'जागतिक एड्स दिना'निमित्त तुम्ही काय करू शकता?

  • स्थानिक स्तरावर HIV/AIDS बद्दल जागरूकता पसरवण्यात मदत करू शकतं.
  • एड्सन बाधित लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना तुम्ही देणगी देऊ शकता.
  • एड्स बाधित लोकांना स्वीकारण्यासाठी समाजात सर्वसमावेशक वातावरण निर्माण करू शकता.

हेही वाचा :

  1. जागतिक लठ्ठपणा विरोधी दिन 2023; लहान मुलांमध्ये लठ्ठपणा कसा नियंत्रित करावा? जाणून घ्या, सविस्तर
  2. जे आर डी टाटा यांची पुण्यतिथी; देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिली नवी भरारी
  3. हिवाळा कंटाळवाणा वाटतो? तुमच्या आहारात करा ऊर्जादायी पदार्थांचा समावेश
Last Updated :Dec 1, 2023, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.