आपल्या छंदाकडे दुर्लक्ष करू नका.. अन्यथा 'या' फायद्यांना मुकाल

author img

By

Published : Sep 6, 2021, 5:39 PM IST

Updated : Sep 6, 2021, 8:32 PM IST

प्रतिकात्मक

तुमचे छंद किंवा सवयी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. तज्ज्ञांच्या मते, एक चांगला किंवा वाईट छंद म्हणजेच हॉबी तुमच्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे प्रभाव टाकू शकतो.

तुमचे छंद किंवा सवयी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. तज्ज्ञांच्या मते, एक चांगला किंवा वाईट छंद म्हणजेच हॉबी तुमच्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे प्रभाव टाकू शकतो. उदाहरणार्थ, चांगल्या सवयी तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

एका संशोधनानुसार, जे लोक सर्जनशील छंद म्हणजेच, हॉबी जोपासतात, त्यांच्या प्रौढकाळ आणि वृद्धकाळात संज्ञानात्मक घट होण्याची शक्यता 32 टक्क्यांपर्यंत कमी होते. हॉबीचा संज्ञानात्मक लाभांव्यतरिक्त फिटनेस आणि आरोग्याचा लाभही आहे. अनेक संशोधनातून समोर आले आहे की, चांगली आणि सकारात्मक हॉबी मनुष्याच्या विचारांत सकारात्मकता आणि जीवनात आनंद, समाधानाबरोबरच आत्मविश्वास वाढवण्यातही मदत करते.

नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपण आपल्या आयुष्यात असे गुंतून जातो की, आपल्या हॉबीकडे दुर्लक्ष करतो. मात्र, जेव्हा आपण आपल्या हॉबीला वेळ देतो तेव्हा फक्त आपला मुडच चांगला होत नाही तर, आत्मिक समाधान देखील मिळते.

2010 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये 'द कनेक्शन बिटवीन आर्ट, हिलिंग अँड पब्लिक हेल्थ : अ रिव्ह्यू ऑफ करंट लिटरेचर नावाचा आभ्यास प्रकाशित झाला होता. यात संशोधकांनी सर्जनशील कार्याचे आरोग्यदायी फायदे तपासले होते. या आभ्यासाच्या निष्कर्षातून समोर आले की, कला आणि मानसिक व शारीरिक आरोग्यामध्ये मजबूत संबंध असतो. विशेषत: या संशोधनात संशोधकांना सर्जनशीलता मेंदू आणि शरीरावर अशा प्रकारे परिणाम करते की, त्यामुळे मूड सुधारते आणि भीती वाटणे कमी होते, त्याचबरोबर संज्ञानात्मक क्रिया वाढते, जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, असे दिसून आले.

संशोधनात असे दिसून आले की, छंद म्हणूनही रचनात्मक अभिव्यक्ती चिंता, नैराश्य किंवा आघाताने ग्रस्त लोकांसाठी उपचारासारखी असते. जसे संगीत मेंदूच्या क्रियाकलापांना शांत करते, ज्यामुळे भावनिक संतुलनाची भावना निर्माण होते, त्याचबरोबर ते कुण्या आघातातून बरे होणाऱ्यांना आणि पीडितांना त्यांचे विचार बाहेर काढण्यास मदत करते. सर्जनशील असल्याने संज्ञानात्मक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संर्जनशीलता कशी मेंदूवर परिणाम करते, याबाबत संशोधकांना पुरावा मिळाला आहे. जसे, कुठल्याही सर्जनशील गोष्टीवर काम करणे, एक छोटी कथा लिहिने असो किंवा बाग लावणे, हे सर्व समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि गंभीर विचार कौशल्य वाढवण्यास मदत करते.

आजारांपासून वाचवते

संशोधनातून असे समोर आले की, जी लोक संर्जनशील हॉबीवर काम करतात त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सनसारखे डीजनरेटिव्ह रोग होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर, मध्यमवयीन आणि वृद्ध लोक ज्यांनी कोणत्याही प्रकारचे सर्जनशील आभ्यास केले जसे, क्राफ्टींग, शिवणकाम, लाकूडकाम किंवा चित्रकला त्यांच्यात संज्ञानात्मक घट होण्याचा धोका कमी दिसून आला. संशोधनातून हेही लक्षात आले की, सर्जनशील असल्याने प्रौढांची संज्ञानात्मक कार्य करण्याची क्षमता आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते, जी भविष्यात मज्जासंस्थेशी संबंधित रोगांना दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करते. त्याचबरोबर, संगीताचा छंद रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य पुनर्संचयित करण्यास मदत करते, त्याचबरोबर स्ट्रेस हार्मोन आणि सुजेच्या पातळीला कमी करण्यासाठीही मदत करू शकते.

हॉबी असण्याचे फायदे

- आपण सकारात्मक दिशेने कार्य करतो आणि अनावश्यक कार्यात वेळ घालवत नाही.

- आंतरिक आनंद आणि समाधान मिळाल्याने अन्य कार्यांना देखील चांगल्या प्रकारे करण्यासाठी सक्षम होतो.

- जर आपली हॉबी आपला रोजगार झाली तर, व्यक्तीला यश मिळण्याच्या शक्यता अधिक वाढते, त्याचबरोबर व्यक्ती आपल्या करिअरमध्ये अधिक समाधानी असतो.

- मूड खराब झाल्यास हॉबीच्या माध्यमातून त्यास चांगले केले जाऊ शकते.

- हॉबीला नियमितपणे आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने नैराश्य बऱ्याच प्रमाणात टाळता येते, त्याचबरोबर कामाचा ताणही कमी जाणवतो.

- हॉबी मानसिक विकासासोबतच व्यक्तिगत विकासात देखील मदत करते.

- हॉबी व्यक्तीला दिशाहीन होण्यास वाचवते.

- अनेकदा छंद किंवा हॉबी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत देखील बनू शकते.

- लिहिण्या किंवा वाचण्यासंबंधी हॉबी व्यक्तीचे ज्ञान वाढवते.

- वृक्षारोपणसारखी हॉबी आपल्या जवळपासच्या पर्यावरणाला शुद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

- व्यायाम, जिम, साइकलिंग आणि पोहण्यासारखी हॉबी आपल्या आरोग्याला अधिक चांगले करण्यास मदत करते.

हेही वाचा - चिंताजनक..! कोविड - 19 पीडित गर्भवती महिलांना प्री-एक्लांपसियाचा अधिक धोका

Last Updated :Sep 6, 2021, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.