ETV Bharat / sukhibhava

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान कोरोना JN1 कडे करू नका दुर्लक्ष, घ्या 'ही' काळजी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 12:45 PM IST

New year 2024
2024नवीन वर्ष

New year 2024 And corona virus : कोरोना विषाणू पुन्हा एकदा नव्या रूपात समोर आला आहे, तो इतका धोकादायक असल्याचे बोलले जात नसले तरी संसर्ग टाळणे गरजेचे आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणं देखील गरजेचे आहे.

हैदराबाद : आजकाल कोरोना विषाणू JN.1 या नवीन प्रकाराचा संसर्ग टाळणं सर्वात महत्वाचे आहे कारण तो भारतात वेगाने पसरत आहे, विशेषत: ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हा काळ आव्हानांनी भरलेला आहे. नवीन वर्ष येणार आहे आणि तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत, पण मित्रांसोबत किंवा सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाची पार्टी करताना थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा कोरोनाचा धोका असू शकतो.

कोरोनाचे नवीन प्रकाराचा संसर्ग टाळण्याचे मार्ग

1. मास्क घाला : कोरोना व्हायरस JN.1 चे नवीन प्रकार टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे मास्क घालणे. हे केवळ तुम्हाला सुरक्षित ठेवत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सुरक्षित ठेवते. संसर्गामुळे फुफ्फुसांना प्रथम नुकसान होत असल्याने, विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणे फार महत्वाचे आहे.

2. हात स्वच्छ ठेवा : नियमितपणे हात धुणे ही एक चांगली सवय आहे जी कोरोनापासून संरक्षण करण्यास मदत करते. तुम्ही साबणाचा योग्य वापर करावा आणि २० सेकंद हात धुवावेत. काही कारणास्तव वारंवार हात धुणे शक्य नसेल, तर हात स्वच्छ करत राहा.

3. सामाजिक अंतर पाळा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अंतर राखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतर ठेवा. शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट आणि डिस्कोमध्ये सामाजिक अंतर पाळा.

4. स्वतःवर नियंत्रण ठेवा : तुम्ही आजारी असाल तर घरीच राहा आणि स्वत:ची काळजी घ्या. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करण्यासाठी बाहेर जाणे योग्य नाही. इतर लोकांना संसर्गाचा धोका नसावा म्हणून स्वतःला वेगळे ठेवा.

5. लसीकरण करा : कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करणे. स्थानिक आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार लसीकरण सुरू करा आणि योग्य लसीकरण करा जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल.

6. सकस आहार घ्या : चांगल्या आरोग्यासाठी तुमच्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकाल. जर तुम्हाला कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा. विशेषतः व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

हेही वाचा :

  1. 'असं' साजरं करा कुटुंबासह नवीन वर्ष; येणार नाही पार्टीची आठवण
  2. 'या' मेकअप टिप्सच्या मदतीने तुमचे नवीन वर्ष बनवा खूप खास
  3. गुलाबी पेरू आरोग्यासाठी फायदेशीर, हिवाळ्यात तो खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.