ETV Bharat / sukhibhava

Health Tips : अरे बापरे! शरीरात रक्ताची कमतरता, मग 'हे' ड्रायफ्रूट खावे भिजवून

author img

By

Published : Oct 27, 2022, 1:31 PM IST

Lack of blood in the body then this dried fruit should be soaked
शरीरात रक्ताची कमतरता, मग 'हे' ड्रायफ्रूट खावे भिजवून

आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा व्हावा, यासाठी नियमित मर्यादित स्वरुपात सुकामेव्याचे सेवन करावे. यामध्ये मनुक्यांचा आवर्जून समावेश करावा. मनुका (raisin) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले (Benefits of raisin) जाते. इतकेच नाही तर मनुका रक्त वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

तज्ज्ञांच्या मते, सुक्या द्राक्षांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. मनुका (raisin) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, तसेच फायबर आणि निरोगी चरबीदेखील असते. हे अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सचाही चांगला स्रोत आहे. इतकेच नाही तर मनुका रक्त वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

अशक्तपणा: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मनुक्यात भरपूर प्रमाणात लोह असते, तसेच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा चांगला स्रोत आहे. दोन्ही हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि लाल रक्तपेशी वाढविण्यास मदत करतात. अशक्तपणा (Anemia) असलेल्या लोकांसाठी मनुका खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी सुकी द्राक्षे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर मात करता येते. वास्तविक, कोरडी द्राक्षे पोटात पाणी शोषून घेतात आणि नंतर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.

भिजवलेले मनुके: मनुकामध्ये कॅल्शियम तसेच बेरॉन आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हाडांना फ्रॅक्चर होण्यापासून वाचवण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत होते. नियमितपणे भिजवलेले मनुके खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि दातांच्या समस्याही दूर होतात. हे दात पोकळी आणि तोंडाच्या हानिकारक जीवाणूंशी लढण्यासाठीदेखील उपयुक्त आहे.

काळ्या मनुक्यांचे सेवन: चेहरा, खांदे आणि पाठीवर मुरुम असतील तर नियमित स्वरुपात काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेशी संबंधित विकार नष्ट करण्याचे प्रयत्न करतात तसंच हानिकारक बॅक्टेरियांविरोधातही लढतात. त्वचेसाठीही काळे मनुके लाभदायक आहेत. काळ्या मनुक्यांचे पाणी प्यायल्याने शरीर योग्य पद्धतीने डिटॉक्स होते. यामुळे बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर: लोह, व्हिटॅमिन-सी आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. भिजवलेल्या कोरड्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन-सी आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. भिजवलेल्या सुक्या द्राक्षांचे सेवन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर (Beneficial for high blood pressure patients) आहे. त्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.