ETV Bharat / sukhibhava

Income Tax On Online Gaming : 1 एप्रिलपासून ऑनलाईन गेमद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरचा वाढणार कर

author img

By

Published : Mar 28, 2023, 3:45 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मिळवलेल्या उत्पन्नावर सरकारने आयकर वाढवला आहे. सरकारने ऑनलाईन गेमवर लावलेला आयकर १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हैदराबाद : सध्या ५जी आल्यापासून नागरिकांचा ऑनलाईन गेम खेळण्याकडे ओढा वाढला आहे. अनेक नागरिक ऑनलाईन गेम खेळण्यातून पैसे कमावत आहेत. मात्र आता १ एप्रिलपासून ऑनलाईन गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार आहे. नाहीतर मोठा भुर्दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय आहेत, ऑनलाईन गेमबाबत आयकर विभागाच्या वतीने करण्यात आलेले नियम.

अगोदर १ जुलैपासून लागू होणार होता कर : आयकर विभागाने ऑनलाईन गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर लागू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार १ जुलैपासून ऑनलाईन गेमवर आयकर लागू करण्यात येणार असल्याची घोषणाही आयकर विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. मात्र आता २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिलपासून आयकर लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत सरकारने लोकसभेत वित्त विधेयक सादर करुन तारीख बदलून घेतली आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमवर १ एप्रिलपासून टीडीएस लागू करण्यात येणार आहे.

काय होते ऑनलाईन गेमबाबत आयकर नियम : देशभरातील अनेक नागरिक ऑनलाईन गेममधून लाखो रुपयाची कमई करतात. यासाठी आयकर विभागाने काही नियम लागू केले होते. देशातील नागरिकांनी जर १० हजार रुपये जिंकले तर, त्यावर टीडीएस कट करण्यात येत होता. आता मात्र ऑनलाईन गेमबाबतचे नियम बदलण्यात आले आहेत. यात ऑनलाईन गेम खेळण्यासाठी जर प्रवेश शुल्क असेल, तर ते वजा करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या रकमेवर ३० टक्के आयकर कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. विशेष म्हणेजे ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांनी आयकर बुडवला तर ५० हजारांचा दंड वसूल करण्यात येत होता. आता मात्र आयकर विभागाने नवीन नियम तयार केल्याने दंड वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा - Link Pan To Aadhaar : आधार कार्डला पॅन लिंक करायला उरले केवळ ४ दिवस, नाहीतर बसेल फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.