ETV Bharat / sukhibhava

Best sleeping time : अरे बापरे! झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ पाळली नाही तर होतील हे धोके

author img

By

Published : Oct 19, 2022, 5:25 PM IST

झोप (Sleep) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? 'लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे' असे शिकवले गेले आहे ते किती खरे आहे ? खरेच तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. झोप शरीरासाठी खूप महत्वाची (Importance of Sleep) आहे हे वारंवार सिध्द झाले आहे. झोपेची वेळ पाळली नाही तर धोके ही आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

शहरात राहताना झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अडचण येते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश, टी. व्ही (TV), आणि इंटरनेट (Internet) असल्यामुळे आपण आपली झोपेची वेळ (Sleeping time) पाळत नाही. खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

विषारी पदार्थ बाहेर टाकणे महत्वाचे (Detoxification): रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया (circulatory process) मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरे तर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची- (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. यकृत शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांना निष्क्रिय करुन त्याला बाहेर काढण्याचे महत्वाचे कार्य रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत करत असते. तथापि जर तुम्ही या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकत नाही. जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.

जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ? : जर 12 वाजता झोपलात तर 3 तास, जर 1 वाजता झोपलात तर 2 तास, आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास इतकाच वेळ तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी मिळेल. जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडणार नाही. तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील. त्यामुळे तुम्ही अनेक आजाराचे बळी पडाल.

तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ? : ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ? ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरं तर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.

पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास काय करावे ? : पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरं तर, तुम्ही शारिरीक हालचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते.

आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते : सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा. सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.