ETV Bharat / sukhibhava

सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होतोय; 'या' 5 उपायांनी मिळवा आराम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 11:38 AM IST

Headache : सकाळी उठल्यानंतर आपला मूड चांगला असायला हवा, परंतु कधीकधी हिवाळ्यात असे होत नाही, याचे कारण म्हणजे सकाळी उठल्यानंतर होणारी डोकेदुखी आहे. यामुळं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो. त्यामुळं सकाळच्या डोकेदुखीपासून आराम मिळणं खूप गरजेचं आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गांनी तुम्हाला सकाळच्या डोकेदुखीपासून आराम मिळेल.

Headache after waking up in the morning
सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होतोय

हैदराबाद : सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजेतवानं रहायचंय ? खराब मूडमुळे, दिवसभर काम करणं कठीण होतं. तुम्हाला खूप चिडचिडदेखील वाटू शकते. हिवाळ्यात अनेकांना असं घडतं की सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी होते. सकाळच्या डोकेदुखीची समस्या सहसा हिवाळ्यात वाढते. हे कमी तापमान आणि थंड वाऱ्यामुळं असू शकतं. परंतु इतर अनेक कारणं असू शकतात. ही तुमच्या दिवसाची खूप वाईट सुरुवात असू शकते. म्हणून या समस्येपासून मुक्त होणं खूप महत्वाचं आहे. सकाळच्या डोकेदुखीपासून तुम्ही कोणत्या मार्गांनी आराम मिळवू शकता.

  • तणाव व्यवस्थापित करा : तणावाची अनेक कारणं असू शकतात, जसे की बदलती जीवनशैली, कामाचा दबाव किंवा कोणतेही वैयक्तिक कारण असणं. हे सर्व घटक तुमच्या तणावाचं कारण असू शकतात. यामुळं डोकेदुखीची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळं तणावाचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यात देखील मदत करू शकतं.
  • ह्युमिडिफायरचा वापर : सायनसशी संबंधित समस्या हिवाळ्यात अनेकदा उद्भवतात, ज्यात रक्तसंचयदेखील समाविष्ट आहे. सर्दी आणि खोकल्यामुळं नाकात अडथळा येतो. श्वास घेण्यास त्रास होतो तसेच डोकेदुखी देखील होऊ शकते. त्यामुळं तुमच्या खोलीत ह्युमिडिफायर वापरा. ज्यामुळे हवेतील ओलावा टिकून राहील. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
  • थंडीपासून स्वत:चा बचाव करा : रात्रीच्या वेळी जाड ब्लँकेट वापरा. जेणेकरून थंड वारा तुमच्या डोक्यात आणि कानापर्यंत पोहोचू नये. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टोपी घालूनही झोपू शकता. हे सर्दीपासून तुमचे संरक्षण करेल. सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देईल.
  • ठराविक वेळी झोपा : तुमच्या अंतर्गत घड्याळाला सर्कॅडियन रिदम म्हणतात. यामध्ये गडबड झाल्यामुळे डोकेदुखीदेखील होऊ शकते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे अंतर्गत घड्याळ चांगले काम करेल. डोकेदुखीची समस्याही कमी होऊ शकते.

हेही वाचा :

  1. डार्क चॉकलेटचे अनेक आरोग्य फायदे; आहारात करा समावेश
  2. भारतात एकदा नव्हे, तर पाच वेळा साजरे केले जाते नवीन वर्ष, जाणून घ्या केव्हा आणि का साजरे केले जाते
  3. कशी सुरू झाली नवीन वर्ष साजरं करण्याची प्रथा? जाणून घ्या सर्वकाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.