ETV Bharat / sukhibhava

'निरोगी जीवनशैलीने' करा थायरॉइडवर मात

author img

By

Published : May 26, 2021, 10:45 PM IST

Get rid of thyroid with a healthy lifestyle
निरोगी जीवनशैलीने करा थायरॉईडवर मात

थायरॉइड ही समस्या आहे जी आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. तज्ञांच्या मते, थायरॉइडशरीराच्या प्रत्येक भागाच्या कार्यांवर परिणाम करतो. थायरॉइडग्रस्त एखाद्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे सेवन केल्यास, योग्य खाणपान केल्यास निरोगी जीवनशैलीच्या आधारे थायरॉइडमुळे होणाऱ्या समस्यापासून आपण वाचू शकतो.

हैदराबाद - जगात मोठ्या संख्येने लोक थायराइडने ग्रासलेले आहे. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १० पैकी १ भारतीय हाइपोथायराइडिज़्मने ग्रस्त होत आहे, असे आकडे सागंतात. व्यग्र जीवनशैली आणि वेळेवर जेवण न करणे या बाबी शरीरात थायराइडच्या स्तिथीला प्रभावित करत असते, असे तज्ञ सांगतात.

खाण्यापिण्याच्या योग्य सवयींनी थायरॉइड नियत्रंण ठेवावे -

थायरॉइड ही समस्या आहे जी आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. तज्ञांच्या मते, थायरॉइडशरीराच्या प्रत्येक भागाच्या कार्यांवर परिणाम करतो. थायरॉइडग्रस्त एखाद्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे सेवन केल्यास, योग्य खाणपान केल्यास निरोगी जीवनशैलीच्या आधारे थायरॉइडमुळे होणाऱ्या समस्यापासून आपण वाचू शकतो.

थायरॉइड म्हणजे काय?

थायरॉइड हा अंतःस्रावी ग्रंथीचा एक प्रकार आहे जो ट्रायओडायोथेरोनिन (टी 3) आणि थायरॉक्सिन (टी 4) हार्मोन्स तयार करतात. जे शरीराच्या चयापचय प्रक्रिया संचालीत करतात. फुलपाखरूच्या आकाराच्या ग्रंथी गळ्याच्या आत आणि गळपट्टीच्या हाडाच्या वर असते.

थायरॉइड प्रामुख्याने हायपरथायरॉइडीझम आणि हायपोथायरॉइडीझम अशा दोन प्रकार असतात. शरीरात हार्मोन्स आणि आयोडीनचे प्रमाण कमी होणे किंवा जास्त होण्यामुळे परिस्थिती उद्भवते.

बंगळुरुच्या कोरामंगला येथील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे पोषणतज्ञ डॉ. शरणा श्रीनिवास शास्त्री यांच्यानुसार शरीरातील हार्मोन्सच्या पातळीसह एखाद्या व्यक्तीचे वजन आणि आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटकांमुळे हायपरथायरॉईडीझम, हायपोथायरॉइडीझम आणि थायरॉइडीटिससारखी परिस्थिती उद्भवतात. ज्यामुळे व्यक्तीचे केस गळणे, टक्कल पडणे, वजन कमी होणे किंवा वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी, थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या लक्षणांच्या आधारावर थायरॉइडला हायपरथायरॉइडीझम आणि हायपोथायरॉइडीझममध्ये वर्गीकृत केले जाते.

थायरॉइड वर्गीकरण खालीलप्रमाणे -

हायपरथायरॉईडीझमची लक्षणे - अस्वस्थता, हृदयाची गती वाढणे, विचलित होणे, चिडचिड वाढणे, जास्त घाम येणे, सतत वजन कमी होणे आणि अशक्तपणा ही हायपरथायरॉइडीझमची मुख्य लक्षणे आहेत.

या स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीवर होणारी आरोग्य समस्या खालीलप्रमाणे -

ग्रेव्ह रोग - ग्रेव्हज हा रोग हा प्रौढांमध्ये हायपरथायरॉइडीझमचे मुख्य कारण आहे. या रोगात शरीराचे वेटिंग सिस्टम टीटीएच वाढविणारे अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते. हा एक अनुवांशिक आजार आहे.

थायरॉइड नोड्यूल -थायरॉइड नोड्यूल थायरॉइडच्या आत घन किंवा द्रवयुक्त भरलेली गांठ असते.बहुतेकदा, डॉक्टरांनी तपासणी केल्याशिवाय लोकांना थायरॉईड नोड्यूल माहिती होत नसते.

थायरॉइडायटीस - थायरॉइड ग्रंथीमध्ये सूज येणाच्या अवस्थेस थायरॉइडायटीस म्हणतात.

आयोडीनसंबंधित समस्या - शरीरात आयोडीनची जास्त प्रमाणात निर्मिती होणे.

हायपोथायरॉइडीझमची लक्षणे - त्वचा आणि केसांचा कोरडेपणा, अशक्तपणा, जास्त वजन वाढणे, ताणतणाव, थंड वस्तू आणि थंड वस्तूसाठी वाढलेली संवेदनशीलता हायपोथायरॉइडीझमचा मुख्य लक्षण आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे आहेत.

थायरॉइडायटीस - थायरॉइड ग्रंथीमध्ये जळजळ होणे आणि सूज येणे

हाशिमोटो थायरॉइडायटीस -ऑटोम्यून्यून स्टेट

प्रसुतिपश्चात थायरॉइडायटीस - प्रसूतीनंतर स्त्रियांमध्ये अशी स्थिती उद्भवते जी आयोडीनची कमतरता किंवा थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित कार्य करत नसल्यामुळे होते.

कोरोनाच्या काळात थायरॉइड रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे.

कोरोनाच्याच्या या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, आजार असलेल्यांनी स्वत: च्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉइड रूग्णांनी देखील त्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी योग्य ठेवण्याची गरज आहे. तसेच रोजच्या आयुष्यात काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

नियमितपणे योग आणि ध्यान करण्याचा सराव केल्यास ताण कमी होतो. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, प्रक्रिया केलेले अन्नही खाऊ नये,नेहमीच ताजे अन्न खावे. याव्यतिरिक्त जास्त प्रमाणात खाणेही टाळावे.

डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी. शक्य असल्यास सर्व औषधांचा साठा घरीच ठेवावा. गरज पडल्यास औषधांची कमतरता भासता कामा नये. धूम्रपान आणि दारुचे सेवन टाळावे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम थायरॉइडवर आणि त्याच्या औषधांचा परिणाम कमी करण्यावर होतो.

झोपेच्या नियमांचे पालन करणे -

झोपेच्या नियमांचे पालन करावे, थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थता या स्वरूपात थायरॉइडचा शरीरावर परिणाम होतो,

अपुऱ्या झोपेचा देखील यावर परिणाम होतो म्हणूनच, आवश्यक प्रमाणात विश्रांती घेणे आणि दररोज किमान 7 ते 9 तासांची झोपे घेणे खूप महत्वाचे आहे. तसेच निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. थायरॉइडच्या अवस्थेत वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे, म्हणून नियमित व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. शक्य झाल्यास तितक्या लवकर लसीकरण करावे. याव्यतिरिक्त, कोविडची कोणतीही लक्षणे लक्षात आढळल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब थायरॉइडच्या समस्येबद्दल सांगून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व योग्य उपचार करावे.

थायरॉइडमध्ये फायदेशीर असणारे पदार्थांबद्दल सांगताना डॉ. शरण्य म्हणतात, की संतुलित आहार, विशेषत: प्रथिने, आयोडीन आणि अमीनो अॅसिड आवश्यक आहेत. नियमीत जीवनशैली आणि औषधांच्या सेवनाने थायरॉइडग्रस्त व्यक्ती निरोगी आयुष्य जगू शकते. तर काही विशेष खाद्यपदार्थाचे सेवन केल्याने थायरॉइडच्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

केसर

केळी

चण्याची दाळ

बेक केलेली मोसळी

खिचड़ी पोंगल

रसम, दाळ किंवा त्यासोबत धान्य

जरी हे सर्व पदार्थ थायरॉइड रूग्णांसाठी योग्या मानले जातात तरीही ते फार महत्वाचे आहेत कोणताही विशिष्ट आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. थायरॉइडपासून बचाव करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे, खाण्याच्या चांगल्या सवयीं असणे, निरोगी जीवनशैली अवलंबणे देखील खूप महत्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.