ETV Bharat / sukhibhava

Cold Water Make You Sick : सावधान, खूप थंड पाणी पिल्याने तुम्ही पडू शकता आजारी, उन्हाळ्यात 'अशी' घ्या काळजी

author img

By

Published : Apr 11, 2023, 10:14 AM IST

Updated : Apr 11, 2023, 2:44 PM IST

वाढत्या त्रास होत असल्याने नागरिक घशाला आराम देण्यासाठी खूप थंड पाणी पितात. बर्फमिश्रित पाण्याचा, कोल्ड ड्रिंक्सचा पर्याय वापरतात. मात्र खूप थंड पाणी पिल्याने नागरिकांना आजार वाढण्याचा धोका असल्याचा दावा हरिद्वार आरोग्यधामचे फिजिशियन डॉ रामेश्वर शर्मांनी केला आहे.

Cold Water Make You Sick
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिक थंड पाण्याचा किवा बर्फाचा आधार घेत गरमी कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र बर्फ किवा खूप थंड पाणी पिल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे अनेकदा आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बर्फमिश्रित थंड पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे. खूप थंड पाणी पिल्यामुळे सर्दीसह पचन, हृदय आणि इतर अवयवांचे देखील आजार होऊ शकत असल्याचा दावा हरिद्वार आरोग्यधामचे फिजिशियन डॉ रामेश्वर शर्मा या तज्ज्ञांनी केला आहे.

बर्फ घशाला देतो आराम तर आरोग्याला घातक : उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास होत असताना बर्फ किवा थंड पाणी घशासह शरीराला उष्णतेपासून आराम देते. मात्र आरोग्याला बर्फ खूप घातक ठरू शकते. रेफ्रिजरेटरचे थंड पाणी शरीराला हानी पोहोचवत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. यामुळे सर्दीचा त्रास होऊन पचनामध्येही समस्या निर्माण होतात. बर्फमिश्रित खूप थंड पाणी पिल्याने आपल्या हृदयाला हानी पोहोचते. त्यामुळे बर्फमिश्रित पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे.

का आहे बर्फाचे पाणी हानिकारक : अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार आदी उपचारांच्या सर्व वैद्यकीय शाखांमध्ये पाणी नेहमी सामान्य तापमानानुसार प्यावे यावर भर दिला जातो. हरिद्वार आरोग्यधामचे फिजिशियन डॉ रामेश्वर शर्मा यांनी आयुर्वेदात पाणी पिण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आल्याची माहिती दिली आहे. नेहमी बसून पाणी प्या, नेहमी खोलीच्या तापमानानुसार पाणी प्या, जेवण करताना थंड पाणी पिऊ नका, जेवणानंतर फक्त कोमट पाणी पिण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

थंड पाणी पचनसंस्थेतील पाचक अग्नी करते कमी : आयुर्वेदामध्ये अन्नासोबत किंवा अगदी सर्वसाधारणपणे जास्त थंड पाणी पिणे टाळावे असे सांगितले आहे. बर्फाचे पाणी किंवा खूप थंड पाणी पचनसंस्थेतील पाचक अग्नी कमी करते. पाचक अग्नी किंवा जठराग्नी पचनसंस्थेची सर्व कार्ये चालवण्यास, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासह अन्नातून जास्तीत जास्त प्रमाणात पोषक आहार घेण्यास मदत करते. पाणी जितके थंड असेल तितके ते पचनशक्ती कमी करते. त्यामुळे अन्न पचण्याची प्रक्रिया मंदावते. याशिवाय फ्रीजमधील जास्त थंड किंवा बर्फाचे पाणी पिल्याने मोठे आतडे आकुंचन पावण्याचा धोका असतो. त्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होऊन अपचनासह बद्धकोष्ठता होऊ शकते असा दावाही त्यांनी केला.

काय होऊ शकतो त्रास : आयुर्वेदामध्ये बद्धकोष्ठता हे जवळपास सर्व प्रकारच्या आजारांचे मूळ असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत बर्फासह थंड पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेशिवाय इतर अनेक आरोग्य समस्या वाढतात. शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. शरीरातील आहारातून पोषण घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. याशिवाय खूप थंड किंवा बर्फाचे पाणी पिल्याने शरीरात कफाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे सर्दी आणि शिंका येणे यासारख्या समस्या कायम राहतात. उन्हातून लगेच सावलीत आल्यानंतर बर्फाचे पाणी पिल्याने धमन्या आणि नसांवरही परिणाम होतो. त्या आकुंचन पावत असल्याचा दावाही डॉ शर्मा यांनी केला आहे. खूप थंड पाणी शरीराला योग्य प्रकारे हायड्रेट ठेवण्यास सक्षम नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

माठ आहे चांगला पर्याय : उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरचे पाणी किंवा बर्फाच्या पाण्याऐवजी माठातील पाणी पिणे चांगले असल्याचे डॉ शर्मा यांनी स्पष्ट केले. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड असते, त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे मातीच्या मडक्यामध्ये देखील जलशुद्धीकरणाचा दर्जा असतो. पाण्यात खनिजे देखील वाढत असल्याचा दावा डॉ शर्मा यांनी केला आहे.

हेही वाचा - Mobile Use In Toilet : तुम्ही शौचालयात मोबाईल वापरत असाल तर व्हा सावध, होऊ शकतात हे आजार

Last Updated :Apr 11, 2023, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.