ETV Bharat / sukhibhava

strengthen your memory : 'हे' खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती मजबूत होईल

author img

By

Published : Nov 24, 2022, 3:04 PM IST

Eating these will strengthen your memory
'हे' खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती मजबूत होईल

फळे, भाज्या, चहा, वाईनमध्ये अँटिऑक्सिडंट फ्लेव्होनॉल आढळतात. रश युनिव्हर्सिटीच्या संशोधनात (Rush University research) असे दिसून आले आहे की, ते स्मरणशक्ती कमी होण्यास प्रतिबंध करतात. पौष्टिक पदार्थांचा अभाव, वाढते वय या कारणांमुळेही स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय...(Doing these things will strengthen your memory)

वॉशिंग्टन: फळे, भाज्या, चहा, वाईनमध्ये अँटिऑक्सिडंट फ्लेव्होनॉल आढळतात. रश युनिव्हर्सिटीच्या संशोधनात (Rush University research) असे दिसून आले आहे की, ते स्मरणशक्ती कमी होण्यास प्रतिबंध करतात. फ्लेव्होनॉल्स (Flavonols) हे वनस्पतींमध्ये आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या फ्लेव्होनॉइड्सच्या कुटुंबातील आहेत. लिंगभेद, वृद्धत्व, धूम्रपान यासारख्या कारणांमुळे लोकांची स्मरणशक्ती कमी होते (People lose their memory). संशोधक थॉमस हॉलंड यांनी उघड केले की, जे लोक फ्लेव्होनॉल युक्त फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार घेतात त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण इतरांपेक्षा कमी होते. त्यांनी स्पष्ट केले की, याचे कारण फ्लेव्होनॉलचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. (Doing these things will strengthen your memory)

पौष्टिक पदार्थांचा अभाव, वाढते वय या कारणांमुळेही स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय खालीलप्रमाणे:

१. फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन: फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास मेंदूच्या रक्त नलिका मजबूत आणि लवचिक होतात. फॉलिक अ‍ॅसिड हे यापैकी एक आहे. याची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास थकवा, चिडचिड, राग, अशक्तपणा आणि एनीमिया यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांप्रमाणेच शरीरातील फॉलिक अ‍ॅसिड म्हणजेच व्हिटॅमिन-बी 9 (Vitamin B9) ची कमतरताही पूर्ण होणे (Folic Acid Diet) आवश्यक आहे.डोक्याला फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन मिळाल्याने स्मरणशक्ती वाढते. वांगी खाल्ल्यानेही फायदा होतो.

२. बदामाचे सेवन करा: नियमित बदाम सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचे प्रमाण कमी असते. यातील प्रोटीन, मॅगनीज, कॉपर आणि रायबोफ्लाविनमुळे अल्झायमरसारखे आजार दूर राहतात. रोज रात्री ५ बदाम भिजवा. सकाळी उठल्यावर ते खा.

३. रोज आठ तास झोप घ्या: चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती कायम ठेवण्याच्या क्षमतेची वाढ होते. ४. नियमित ध्यान, प्राणायाम आणि व्यायाम केल्याने तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन, रक्त आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.