ETV Bharat / sukhibhava

Diwali 2023 : या दिवाळीत मिठाई खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 3:25 PM IST

Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की मिठाई येणारच, मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. आता बाजारात मिठाई तयार झाल्या आहेत. रंगीबेरंगी मिठाई पाहून तोंडाला पाणी सुटते पण ती खाण्याआधी तितकीच काळजी घ्यावी लागते.

Diwali 2023
दिवाळी मिठाई

हैदराबाद : दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण, हा सर्वात खास सण आहे. फटाके, मिठाई, दिवे हे या सणाचे प्राण आहेत. बाजारात मिठाईचे ढीग लागले आहेत. रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट मिठाईनं दुकानं सजत आहेत. पण भेसळीचा धंदाही जोरात सुरू आहे. अशा वेळी तुमची एक चूक सणाच्या आनंदात अडचणी आणू शकते. त्यामुळं जेव्हाही तुम्ही मिठाई खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित जावो.

बनावट मिठाईपासून दूर रहा : बाजारातून मिठाई खरेदी करणार असाल तर अनेक रंगीबेरंगी मिठाई पाहायला मिळतील. या सुंदर दिसणार्‍या मिठाईपासून लांब रहा. कारण या मिठाईमुळं अ‍ॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात. मग सणाची मजा लुटता येत नाही. त्यामुळं रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणं आणि खाणं टाळावं हे लक्षात ठेवा.

मिठाईवरील चांदीच्या कामामुळे गोंधळून जाऊ नका : बाजारात अनेक मिठाईंवर चांदीचे काम दिसून येते. हे अतिशय तेजस्वी आणि आकर्षक आहेत. आता तुम्हाला वाटेल की या गोडावर चांदीचे काम झाले आहे, परंतु यामुळे गोंधळून जाऊ नका. कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा मिठाई टाळल्या पाहिजेत.

भेसळयुक्त मावा टाळा : सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताना विश्वासू किंवा चांगल्या दुकानातूनच खरेदी करा. माव्यात दुधाची पावडर भेसळ करणं आरोग्यासाठी घातक आहे. माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. मावा निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ आहे. त्यामुळे दिवाळीत घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा. बाजारातून मिठाई खरेदी करणार असाल तर भेसळयुक्त मिठाईपासून दूर राहा.

हेही वाचा :

  1. Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीत बच्चे कंपनीमध्ये 'फटाके रॅपर चॉकलेट'ची क्रेज
  2. Diwali puja 2023 : दिवाळीत पूजा करताना अवश्य करा 'या' गोष्टींचा समावेश
  3. Diwali 2023 : आला दिवाळीचा महिना ; जाणून घ्या शुभ काळ आणि पूजा पद्धत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.