ETV Bharat / sukhibhava

Brain Function Changes During Dieting : डायट दरम्यान मेंदूचे बदलते कार्य; जाणून घ्या शरीरात काय होतात बदल

author img

By

Published : Apr 3, 2023, 2:01 PM IST

Brain Function Changes During Dieting
संग्रहित छायाचित्र

सध्या फास्ट फूड आणि अवेळी जेवणामुळे अनेकांना वजन वाढण्याचा त्रास होतो. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी अनेकजण डायट करतात. मात्र डायट करत असताना मेंदूचे कार्य बदलत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

वॉशिंग्टन : वजन वाढल्यामुळे अनेकजण डायट करतात, मात्र डायटमुळे मेंदूचे कार्य बदलत असल्याचा धक्कादायक दावा संशोधकांनी केला आहे. उपासमारीमुळे चेतापेशींना मोठ्या प्रमाणात सिग्नल प्राप्त होतात. त्यामुळे उंदरांमध्ये डायटनंतर लक्षणीय प्रमाणात भूक लागून त्यांचे वजन लवकर वाढल्याचेही या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मेटाबॉलिझम रिसर्च आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे.

उंदराच्या मेंदूत बदल : डायट करताना मेंदूच्या कार्यात नेमके काय परिणाम होतात, याबाबत संशोधकांना संशोधन करायचे होते. याबाबत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मेटाबॉलिझम रिसर्चचे संशोधक हेनिंग फेन्सेलाऊ यांनी उंदराला डायटवर ठेवून त्याच्यात काय परिणाम होतात, याबाबत संशोधन केले. यावेळी संशोधकांनी उंदराच्या मेंदूतील कोणते सर्किट बदलले याचे मूल्यांकन केले. त्यांनी हायपोथालेमसमधील न्यूरॉन्सच्या गटाची तपासणी केली. एजीआरपी न्यूरॉन्स हे भुकेची भावना नियंत्रित करण्यासाठी ओळखले जातात. एजीआरपी न्यूरॉन्सला उत्तेजित करणारे न्यूरोनल मार्ग उंदीर डायटवर असताना मोठ्या प्रमाणात सिग्नल पाठवत असल्याचे दिसून आल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला. मेंदूतील हा गंभीर बदल डायटनंतर बराच काळ शोधला जाऊ शकतो, असेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले.

डायटनंतर वजन झाले कमी : या संशोधकांनी एजीआरपी न्यूरॉन्स सक्रिय करणार्‍या उंदरांमधील न्यूरल मार्ग निवडकपणे प्रतिबंधित करण्यात देखील यश मिळविले. यामुळे डायटनंतर वजन लक्षणीय कमी झाल्याचा दावा या संशोधकांनी केला. हे आम्हाला यो यो प्रभाव कमी करण्याची संधी देऊ शकत असल्याचेही संशोधक हेनिंग फेन्सेलाऊ यांनी स्पष्ट केले. मानवांसाठी अशा उपचारांचा शोध घेणे हा या संशोधनाचा हेतू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डायटवर असल्यानंतर शरीराचे वजन कमी करण्यात मदत करू शकतील, असा दीर्घकाळात परिणामकारक ठरणारा डायट आम्ही शोधत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही मानवी तंत्रिका मार्गांच्या बळकटीकरणात मध्यस्थी करणार्‍या यंत्रणा कशा रोखता येतील, यावर संशोधन करत असल्याचेही त्यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे.

डायटनंतर लागते अतिभूक : डायटनंतर भूक लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संशोधकांनी या संशोधनावर भर दिला आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनात न्यूरल वायरिंग आकृती भूक कशी नियंत्रित करते, याची समज वाढवत असल्याचे दिसून आले आहे. आम्ही याआधी अपस्ट्रीम न्यूरॉन्सचा एक मुख्य संच शोधून काढला होता. त्यामुळे शारीरिकरित्या एजीआरपी हंगर न्यूरॉन्सवर सिनॅप्स उत्तेजित करतात. मात्र आमच्या सध्याच्या अभ्यासात आम्हाला दोन न्यूरॉन्समधील भौतिक न्यूरोट्रांसमीटर कनेक्शन सिनॅप्टिक प्लास्टीसिटी नावाच्या प्रक्रियेत आहार आणि वजन कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे दीर्घकाळ टिकणारी अतिभूक लागत असल्याचा दावाही हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधक ब्रॅडफोर्ड लॉवेल यांनी केला आहे.

हेही वाचा - Poor Sleep Can Affect Your Work : खराब झोपेचा कामावर होतो वाईट परिणाम; जाणून घ्या चांगले काम करण्याचे मार्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.