ETV Bharat / sukhibhava

तुम्हालाही काही गोष्टी आठवत नाही? मग वापरा 'या' टीप्स

author img

By

Published : Jul 10, 2020, 3:28 PM IST

memory booster tips  how to boost memory  स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपाय  स्मरणशक्ती कशी वाढवायची
प्रातिनिधीक छायाचित्र

बऱ्याचदा असं होतं, की तुम्हाला काही गोष्टी आठवत नाही. त्यावेळी आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र, या काही गोष्टींचे तुम्ही पालन केले, तर नक्कीच तुमची स्मरणशक्ती चांगली राहील.

हैदराबाद - प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विसर पडत असतो. विशेषतः आपल्या आयुष्यात एकावेळी अनेक गोष्टी सुरू असतील त्यावेळी विसरण्याचे प्रकार घडत असतात. अनेकदा गोष्टी आठवत नसेल तर आपली चिडचिड होते. त्यामुळे आम्ही स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलोय काही खास टीप्स...

साखर आणि कार्ब्सचे प्रमाण कमी करा -

आपल्या आहारामध्ये साखर जास्त असेल, तर मानसिक त्रासाबरोबर अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. तसेच स्मरणशक्ती कमी होणे आणि मेंदूचा आकार लहान होणे, असे प्रकार घडत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे फळांसारख्या नैसर्गिकरित्या गोड पदार्थांचे सेवन आणि साखर असलेले पेय घेणे टाळायला पाहिजे. पिझ्झा, केके, मैदा, ब्रेड यासारख्या जंक फूडमध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असते. हे सर्व पदार्थ साखरेपेक्षाही धोकादायक असतात. यामुळे रक्तदाब वाढतो. तसेच मेंदूला देखील इजा पोहोचत असते. त्यामुळे असे पदार्थ टाळणे गरजेचे आहे.

पुरेशी झोप -

सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे असते. तसेच आपल्या मेंदूच्या कार्यामध्येदेखील झोप महत्वाची भूमिका बजावत असते. एका अहवालानुसार, ज्या लोकांना निद्रानाश हा त्रास असतो, त्यांना स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी ७ ते ९ तास झोप घेणे गरजेचे आहे.

व्यायाम -

व्यायामाचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. नियमित व्यायाम केल्याने मेंदूसंबंधी आजार होण्याचा धोका कमी असतो. चालणे, धावणे, पोहणे, एरोबिक्स, योग आदी व्यायाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले असतात.

अँटीऑक्सीडन्ट्स असलेले पदार्थ -

वयानुसार मेंदूवर परिणाम होऊ नये, यासाठी अँटीऑक्सिडन्ट्स असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे. फळे, भाजीपाला विशेषतः बेरी हे अँटीऑक्सिडन्ट्सचे उत्तम स्त्रोत आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेमोरी लॉस होत नाही.

मेडीटेशन -

मेटीटेशन केल्याने शरीर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असतो. मेडीटेशन केल्याने तुम्हाला हलके वाटायला लागते. तसेच ताण-तणाव देखील कमी होतो. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढायला मदत होते. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा दोन्ही मेमोरी चांगल्या राहण्यासाठी मेडीटेशनची मदत होते.

बुद्धीला चालना देणारे गेम्स -

शारीरिक व्यायामासोबतच आपल्या मेंदूचा व्यायाम होणे तितकेच गरजेचे असते. त्यासाठी क्रॉसवर्ड्स, पझल्स आणि बुद्धीला चालना देणारे इतर गेम्स खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

डार्क चॉकलेट -

चॉकलेट खायला मिळाल्यानंतर कोण नाही म्हणणार? चॉकलेट तर सर्वांना आवडतो. पण, डार्क चॉकलेट फक्त चवदारच नसेत, तर त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. तसेच यामध्ये अँटीऑक्सीडन्ट्सचे प्रमाण देखील अधिक असते. मात्र, त्यासाठी तुम्ही खात असलेल्या चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको असणे गरजेचे आहे.

नेहमी मोबाईल, लॅपटॉपची स्क्रीन पाहण्यापेक्षा पुस्तके वाचण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच विसरणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तर लक्षात ठेवणे ही अनैसर्गिक. एखाद्याची स्मरणशक्ती जाणे याला अनुवंशिकता जबाबदार असू शकते. मात्र, आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करून आपण मेंदूसंबंधी आजार टाळू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.