ETV Bharat / state

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या शिकारीचा प्रयत्न

author img

By

Published : May 29, 2019, 11:45 PM IST

अंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबवली. टिपेश्वर, वनरक्षक सुन्ना बिट यांना कक्ष क्रमांक १०१ मध्ये शंभू नाल्यात शिकारी करीता दोरीचे फासे लावल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणाहून ३ किलोमीटर परिसरातील कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या शिकारीचा प्रयत्न

यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्यात रेडीओ कॉलर लावलेल्या टी १ सी ३ वाघाला फास लाऊन शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या अभयारण्यात लावण्यात आलेल्या फासमध्ये वाघाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वाघाला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न टिपेश्वर अभयारण्याच्या प्रशासनाकडून सुरू आहे.

सकाळच्या सुमारास टिपेश्वर अभयारण्यात सफारीसाठी आलेले पर्यटक भट्ट यांच्यासोबत गाईड सलमान बरकत खान, सफारी करत असताना कक्ष क्रमांक १०० मध्ये पिलखान नाल्याजवळ वाघ दिसला. त्यानंतर पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेतले. यात वाघाच्या उजव्या पायाच्या पंज्याच्या वर दोरीचा फास अडकून जखमी झाल्याचे दिसले. दुसऱया वाहनातील पर्यटक आदित्य क्षीरसागर (रा. पुणे) यांच्यासोबत असलेले गाईड राजेंद्र चुकाबोटलावार यांनी सुध्दा पर्यटकांनी घेतलेल्या छायाचित्रावरून वाघाच्या पायाला जखम झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती तत्काळ पांढरकवडाचे विभागीय वन्यजीव अधिकारी डॉ. चेतन पतौड व सहकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नाल्याजवळील कक्ष क्रमांक १०० मध्ये जाऊन या वाघाचे VHF अँटेनाद्वारे लोकेशन घेतले असता, वाघाचे लोकेशन नाल्यातील गवताच्या दिशेने मिळाले. वाघाचे लोकेशन असलेल्या दिशेने जाऊन निरीक्षण केले असता, वाघ नाल्यातील गवतामध्ये बसलेले दिसले.

जखमी वाघाच्या निरीक्षणासाठी जागोजागी कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच क्षेत्रीय सहायक इरफान यांनी वाघावर लक्ष ठेवण्याकरीता उंच झाडावरून निरीक्षण केले. वाघ पळून जात असताना लंगडत असल्याचे निदर्शनास आले. अंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबवली. टिपेश्वर, वनरक्षक सुन्ना बिट यांना कक्ष क्रमांक १०१ मध्ये शंभू नाल्यात शिकारी करीता दोरीचे फासे लावल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणाहून ३ किलोमीटर परिसरातील कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. टिपेश्वर अभयारण्यातील टी १ सी ३ या वाघाच्या पायात दोरीचा फास अडल्याने ती जखमी झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास बेशुध्द करून उपचार करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी प्रमोद पंचभाई यांनी दिली.

Intro:टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या शिकारीचा प्रयत्नBody:यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील रेडीओ कॉलरलावलेल्या T1C3 वाघाला फास लाऊन शिकार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
या लावलेल्या फासमध्ये वाघाचा पायाला गंभीर इजा झाली असून त्याला बेशुध्द करून त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न टिपेश्वर अभयारण्य यांच्याकडून सुरू आहे.
आज सकाळच्या सुमारास टिपेश्वर अभयारण्यात सफारी करता आलेले पर्यटक श्री. भट्ट यांचे सोबत गाईड सलमान बरकत खान, सफारी करत असतांना कक्ष क्रमांक 100 मध्ये पिलखान नाल्याच्या वर वाघ दिसल्या नंतर पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेतले.
यात वाघाच्या उजव्या पायाच्या पंज्याच्या वर दोरीचा फास अडकुन जखम झाल्याचे निदर्शनास आले. याच ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या दुस-या वाहनातील पर्यटक अदित्य क्षिरसागर (रा. पुणे) यांचे सोबत असलेले गाईड राजेंद्र चुकाबोटलावार यांनी सुध्दा पर्यटकांनी घेतलेल्या छायाचित्रावरून वाघाच्या पायाला जखम झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ डॉ . चेतन पतौड
विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) टिपेश्वर क्षेत्रीय अधिका-यांसोबत पिलखान नाल्याजवळ कक्ष क्रमांक 100 मध्ये जाऊन सदर वाघाचे VHF अँटेनाव्दारे लोकेशन घेतले असता वाघाचे लोकेशन नाल्यातील गवताच्या दिशेने मिळाले. वाघाचे लोकेशन असलेल्या दिशेने जाऊन निरीक्षण केले असता वाघ नाल्यातील गवतामध्ये बसलेल्या परिस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. वाघाचे निरीक्षणा करिता रस्त्यालगत वाहानामध्ये सुध्दा क्षेत्रीय कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच क्षेत्रीय सहायक इरफान याने वाघावर लक्ष ठेवण्याकरीता उंच झाडावरन निरीक्षण केले. वाघ पळून जात असतांना लंगडत असल्याचे निदर्शनास आले नाही. त्यानंतर वाघाचे लोकेशन नाल्याच्या वरच्या बाजूला असल्याचे निदर्शनास आले. अंतर्गत क्षेत्रीय कर्मचा - यांकडून शोधमोहिम राबवुन गस्त करण्यात आली होती . टिपेश्वर, वनरक्षक सुन्ना बिट हे क्षेत्रीय कर्मचा - यांसोबत गस्तीवर असतांना त्यांना कक्ष क्रमांक 101 मध्ये शंभू नाल्यात 4-5 ठिकाणी जवळ - जवळ शिकारी करिता दोरीचे फासे नाल्यातील वाळू आणि पाला पाचोळयाने झाकुन लावल्याचे निदर्शनास आले होते . या ठिकाणाहुन 3 किलोमीटर परिसरातील कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाच्या आरोपींचा शोध घेण्याचे क्षेत्रीय कर्मचारी व विशेष व्याघ्र संरक्षण दल कर्मचा-यांकडून कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील T1C3 या वाघाच्या पायात दोरीचा फास अडकुन त्यास जखम झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी जखमी वाघास बेशुध्द करून त्याच्यावर उपचार करण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आलेली असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी प्रमोद पंचभाई यांनी दिली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.