ETV Bharat / state

पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पीकविमा कंपनीला घेराव; अन्यथा न्यायालयाचे दार ठोठाऊ

author img

By

Published : Dec 16, 2020, 1:09 PM IST

खासदार भावना गवळी
खासदार भावना गवळी

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. मात्र, कित्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी खासदार भावना गवळी यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे.

यवतमाळ - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च सुध्दा निघाला नाही. अशा परीस्थितीत पिकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्याइतक्यात शेतकऱ्यांना पीकविमा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, अन्यथा पिकविमा कंपनीला घेराव घालू, वेळ पडल्यास न्यायालयातही जाऊ असा इशारा शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.

पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पिकविमा कंपनीला घेराव
कोरोनानंतर अतिवृष्टीचे संकटशेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीचे संकट आले. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर संततधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, धान, मका, कापूस, ज्वारी, तूर, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकही परतीच्या आणि ढगफुटीच्या पावसाने नष्ट झाले. शेतकरी हा नैसर्गीक आपत्ती ओढवल्यास आर्धिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या करीता पीक विमा काढत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळायलाच हवा अशी मागणी गवळी यांनी केली.केवळ साडेनऊ लाख शेतकऱ्यांना फायदा-जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतक-यांनी प्रधानमंत्री पिकविमा काढला आहे. या करीता केन्द्र शासन, राज्य शासन तसेच शेतक-यांनी इफको टोकीयो विमा कंपनीकडे 35 कोटी 75 लाख 1 हजार 251 रुपयांचा विमा हप्ता भरला. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना विमा कंपनीने मात्र फक्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करणाऱ्या फक्त 9 हजार 547 शेतकऱ्यांनाच विम्याला लाभ दिला आहे.

नुकसानीचा दावा दाखल करण्यास शेतकरी असमर्थ-

विमा कंपनीने सोळा तालुक्यात फक्त 100 प्रतिनिधींची सर्वेक्षण करण्याकरीता नेमणूक केली. त्यामुळे लाखो शेतकरी नुकसानीचा दावा दाखल करु शकले नाहीत. विशेष म्हणजे कृषी विभागाने सुध्दा जिल्ह्यातील साडे चार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत पिकविमा नुकसान भरपाई न मिळाल्यास पिकविमा कंपनीला घेराव घालण्याचा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.