ETV Bharat / state

Yavatmal Rain Update : यवतमाळमध्ये मुसळधार; हेलिकॉप्टरद्वारे वाचवले अनेकांचे जीव

author img

By

Published : Jul 22, 2023, 5:22 PM IST

यवतामाळमध्ये अतिवृष्टी
यवतामाळमध्ये अतिवृष्टी

यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा प्रमाणात पूर आलेला आहे. महागाव तालुक्यातील आनंदनगर येथील पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

यवतमाळ :गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 16 पैकी 14 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. यवतमाळ तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला असून अवघ्या 24 तासात 266 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महागाव तालुक्यात 131 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या 40 जणांना वाचवण्याठी नागपूरवरुन एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर आणण्यात आले.

महाराष्ट्र जिल्हा प्रशासनाच्या मागणीच्या आधारे,यवतमाळ जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 40 लोकांना बाहेर काढण्यासाठी एमआय-17व्ही5 हेलिकॉप्टर नागपुरातून आणले जात आहे.-विंग कमांडर रत्नाकर सिंह, संरक्षण पीआरओ, नागपूर

हेलिकॉप्टरद्वारे सुटका नागरिकांची सुटका :महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे पुराच्या पाण्यात दोन घरे वाहून गेली.येथील सुमारे 45 नागरीक पुरात अडकले होते.या नागरिकांना सुरक्षितपणे काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. यवतमाळमधील वाघाडी नदीलाही पूर आला असून पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरात शिरले आहे.याच परिसरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.आर्णी तालुक्यातील दातोडी,थड येथेही पैनगंगा नदीला पूर आला आहे.पैनगंगेचे पाणी नदीकाठच्या घरामध्ये शिरले आहे.नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

वाहतूक बंद: यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा प्रमाणात पूर आलेला आहे. झरी जामणी तालुक्यातील दिग्रस येथे पैनगंगा नदीचे पाणी पुरावरुन वाहत आहे,त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच महागाव तालुक्यातील धनोडा ते माहूर येथीलही वाहतूक बंद करण्यात आली आहे. यवतमाळ-नेर मार्गावरील लासीनजवळ असलेल्या दोन्ही नाल्यांना पूर आल्याने येथीलही वाहतूक बंद करण्यात आली आहे.बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडान नदीला पूर आला आहे. बोरीअरब जवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

  1. Maharashtra Monsoon Rain : आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, वसई विरारला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट
  2. Upper Wardha Dam : अमरावती जिल्ह्यात मुसळधार; अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.