ETV Bharat / state

किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

author img

By

Published : May 12, 2021, 6:56 PM IST

Updated : May 12, 2021, 7:34 PM IST

घटनास्थळ
घटनास्थळ

यवतमाळच्या पुसद शहराजवळ किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वसंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यवतमाळ - पुसद शहरापासून जवळच असलेल्या मधुकरनगर येथे किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालविणाऱ्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

बांधकामाच्या साहित्यावरून झाला वाद

मधुकर नगर येथील रहिवासी सय्यद अली हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. हे करत असताना त्यांच्या शेजारी सय्यद मोईन सय्यद बाबू ठेकेदार यांनी त्याचे ठेकेदारीचे साहित्य मृत सय्यद अली यांच्या रिक्षामध्ये सय्यद मोइन यांनी घेतलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मृत सय्यद अली यांना नेण्यास सांगितले. सय्यद मोईन यांच्या सांगण्यावरून सय्यद अली यांनी हे सेंट्रींगचे साहित्य त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचविले. पण, सय्यद अली यांना त्याचे भाडे सय्यद मोइन यांनी नंतर देतो असे सांगितले. त्यानुसार सय्यद अली हे रिक्षाचे भाडे मागण्यासाठी सय्यद मोईन यांच्या वडिलांच्या घरी गेले असता त्यांनी भाडे माझा मुलगा सय्यद मोईन यांच्याकडून घ्या, असे सांगितले. त्यामुळे सय्यद अली हे आपल्या घरी परत आले.

पैशासाठी घरी आल्याने केली मारहाण

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सय्यद मोईन व त्याचे भाऊ सय्यद मकसूद सय्यद बाबू, सय्यद मोहसीन सय्यद बाबू व तसेच यांच्यासोबत मजुरीचे काम करणारा अजहर खान उर्फ भुऱ्या अफसर खान यांनी सय्यद अली यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत लोखंडी फावडा, लोखंडी पाईप व लाठ्या-काठ्याने मारहाण केली. यावेळी सय्यद मोईन यांनी सय्यद अली यांना लोखंडी फावडा डोक्यात मारून जखमी केले.

त्यानंतर अजहर खान उर्फ भुऱ्या व इतर यांनी लाठ्याकाठ्याने लोखंडी पाइपने मारहाण केली. यात जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले. दरम्यान सय्यद अली यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी शाहिदा सय्यद अली यांच्या तक्रारीवरुन पुसद येथील वसंत नगर पोलीस ठाण्यात सय्यद मोईन सय्यद बाबू व इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी; आठ जण पॉझिटिव्ह

Last Updated :May 12, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.