ETV Bharat / state

Umarkhed Doctor Murder Case : उमरखेड डॉक्टर हत्या प्रकरणी चौघांना अटक; 'या' कारणासाठी डॉक्टरवर झाडल्या गोळ्या

author img

By

Published : Jan 15, 2022, 10:53 PM IST

Updated : Jan 15, 2022, 11:01 PM IST

उत्तरवार रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हनुमंत संताराम धर्माकारे ( Hanumant Dharkare Murder ) यांची उमरखेड पुसद रोडवर साखळे महाविदयालय समोर 11 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात ( 4 Arrest In Hanumant Dharkare Murder ) आली आहे.

Umarkhed Doctor Murder Case
Umarkhed Doctor Murder Case

यवतमाळ - उत्तरवार रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हनुमंत संताराम धर्माकारे ( Hanumant Dharkare Murder ) यांची उमरखेड पुसद रोडवर साखळे महाविदयालय समोर 11 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात ( 4 Arrest In Hanumant Dharkare Murder ) आली आहे. सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (३५), सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील (३२), शेख मौहसिन शेख कय्युम (३४), शेख शहारुख शेख आलम (२७) सर्व रा. ढाणकी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार (२२) हा फरार असून त्याच्या शोधासाठी दहा पथके गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया

'या' कारणासाठी केली हत्या -

4 मे 2019 रोजी शेख अरबाज शेख अब्रार याचा शिवाजी चौक उमरखेड येथे अपघात झाला होता. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी त्याला रुग्णालयात आणले, त्यावेळी उत्तरवार रुग्णालयात डॉ. हनुमंत धर्माकारे कर्तव्यावर हजर होते. डॉ. धर्माकारे यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमीचा मृत्य झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी त्यावेळी केला होता. यासंदर्भात पोलीसांनी गुन्हादेखील नोंदवला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी ऐफाज ऊर्फ अप्पु शेख अनार (२२) याने त्याचे मामा सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (३५) रा. ढाणकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टरवर यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

घटनेच्या दिवशी काय झाले -

गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार ( २२) याने डॉ. हनुमंत धर्माकारे यांच्यावर पाळत ठेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार केले व त्वरीत ढाणकी गाठले. गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल त्याने त्याचा ढाणकी येथील त्याचा मामा सैय्यद तौसिफ सैय्यद याच्या ताब्यात दिली व त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने ढाणकी येथून पसार झाला. शेख ऐफाज शेख अब्रार याने आपला भाऊ शेख अरबाज ऊर्फ हड्डी शेख अब्रार यांच्या मृत्यूचा वचपा व बदला घेण्याच्या उद्देशाने तसेच त्याच्या भावाच्या मृत्युचा डॉक्टरकडून प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडून ठार मारल्याचे समोर आले.

हेही वाचा - World Largest Khadi Tricolor : भारतीय सेना दिनानिमित्त साकारला जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा

Last Updated :Jan 15, 2022, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.