ETV Bharat / state

अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या 8 जणांवर काळाचा घाला; 4 गंभीर

author img

By

Published : Feb 16, 2020, 9:01 PM IST

Updated : Feb 16, 2020, 11:14 PM IST

वाहनातील सर्वजण अस्थी विसर्जन उरकून कोटेश्वर येथून परतताना हा अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून खोल दरीत कोसळले.

Yavatmal accident
यवतमाळ अपघात

यवतमाळ - अस्थी विसर्जन करुन परत येत असलेल्या मालवाहू वाहनांची झाडाला धडक होऊन वाहन दरीत कोसळले. या भीषण अपघातात 8 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना आज सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढोण खुर्द येथे घडली.

महादेव बावनकर (53, रा. शेंदुर्जना घाट), किसन कळसकर (55, रा. जोडमोहा), महादेव चंदनकर (58), गणेश चिंचोळकर (52, रा. महागाव), कृष्णा प्रसन्नकर (55), अंजना वानखेडे (69 सर्व रा. जोडमोहा) वाहन चालक अमर आत्राम (32) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या 8 जणांवर काळाचा घाला

जोडमोहा येथील बाबाराव वानखडे निधन झाले होते. त्यामुळे अपघामधील नागरिक कोटेश्वर देवस्थान येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान, अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे मॅक्झिमो वाहन (एमएच 31 पीक्यू 2774) ने परत येत होते. याचदरम्यान जोडामोहा मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून थेट दरीत कोसळले. या वाहनात एकूण 18 महिला व पुरुष प्रवासी असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी बचाव कार्याला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय राठोड, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी गावकरी व नातेवाईकांनीही घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. या घटनेने वानखेडे कुटुंबासह जोडमोहा गावात शोककळा पसरली आहे.

Last Updated :Feb 16, 2020, 11:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.