ETV Bharat / state

LIVE : वाशिम जिल्हा परिषद निकाल, भाजपला ७, तर जनविकास अन् वंबआ प्रत्येकी ६ जागांवर विजयी

author img

By

Published : Jan 8, 2020, 11:28 AM IST

Updated : Jan 8, 2020, 2:21 PM IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समितीतील 104 सदस्यांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीची सुरुवात झाली असून आतापर्यंत आलेले निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

मतमोजणी केंद्रावरील छायाचित्र
मतमोजणी केंद्रावरील छायाचित्र

LIVE updates

  • अपक्ष 2 जागांवर विजयी
  • जनविकास आघाडी 6 जागांवर विजयी
  • वंचित बहुजन आघाडी 6 जागांवर विजयी
  • राष्ट्रवादी 5 जागांवर विजयी
  • शिवसेना 3 जागांवर विजयी
  • काँग्रेस 5 जागांवर विजयी
  • भाजप 7 जागांवर विजयी
  • दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी 34 जागांचे निकाल लागले आहेत.
  • 12.40 pm - आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी 30 जागांचे निकाल हाती आले आहेत.
  • 10.58 am - धनज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे चंद्रशेखर डोईफोडे विजयी
  • 10.56 am - धनज पंचायत समितीतून राष्ट्रवादीचे मयूर म्हस्के विजयी
  • 10.54 am - बेलखेड पंचायत समितीतून राष्ट्रवादीच्या वर्षा गवई विजयी

वाशिम - जिल्हा परिषदेच्या 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी मंगळवारी (दि. 7 जाने.) मतदान झाले होते. त्याची मतमोजणीला आज (दि. 8 जाने.) 10 वाजता सुरुवात झाली आहे.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही पहिलीच निवडणूक आहे. भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केले असून, सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहणार की, बदल होणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात

Intro:स्लग:- जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणी होणार थोड्याच वेळात सुरवात....

अँकर:-वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी काल मतदान झाले असून,आज 10 वाजता मतमोजणी ला सुरुवात होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून, भाजप स्वतंत्र उमेदवार उभे केले असून,सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळं जिल्हा परिषद वर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहणार की बदल होणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे......Body:जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणी होणार थोड्याच वेळात सुरवात....
Conclusion:जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणी होणार थोड्याच वेळात सुरवात....
Last Updated :Jan 8, 2020, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.