ETV Bharat / state

'युती झाली नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार'

author img

By

Published : Dec 13, 2019, 7:06 PM IST

mete
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे

शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेनेने महायुतीतून काढता पाय घेतल्यानंतर इतर घटक पक्ष कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसंग्राम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

वाशिम - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती होणे शक्य नसेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे. कार्यकर्ता मेळाव्यासाठी जिल्ह्यात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे

हेही वाचा - वाशिम: घरकुलाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर; तक्रारदाराचे टॉवरवर चढून आंदोलन

शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेनेने महायुतीतून काढता पाय घेतल्यानंतर इतर घटक पक्ष कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसंग्राम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यासोबतच, स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Intro:स्लग:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार विनायक मेटे.....

अँकर:- शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून,आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत. मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर राज्यातील होऊ घातलेल्या वाशिम सह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं शिवसंग्राम चे विनायक मेटे यांनी बोलतांना सांगितलंय. आज वाशिम जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यासाठी वाशिम जिल्ह्यात आले असता पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.....Body:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार विनायक मेटे.....
Conclusion:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार विनायक मेटे.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.