वाशिम - प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शहरातील शुक्रवार पेठेलगत असलेल्या मन्नाशिह चौकात घडली. आशिष दीक्षित (ठाकूर) असे प्रियकराचे तर कानोपात्रा राऊत असे गळफास घेतलेल्या प्रेयसीचे नाव आहे.
आशिष (वय 32) आणि कोनोपात्रा (वय 22) हे महाराणा प्रताप चौकात एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्याच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी शहरातील शुक्रवार पेठलगत मन्नाशिह चौकातील एका बंद असलेल्या आखाडा परिसरात आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिली.