ETV Bharat / state

प्रशासनच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात

author img

By

Published : Mar 5, 2021, 3:46 PM IST

lives of the people of Karanja
lives of the people of Karanja

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात कोरोना रुग्णांची संख्या 2 दिवसात 135 च्या वर गेली आहे.

वाशिम - प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात कोरोना रुग्णांची संख्या 2 दिवसात 135 च्या वर गेली आहे. ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आढळत आहे, त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शहरातील भारती पुरा, गुरुमंदिर परिसर आणि सुंदर वाटिका या 3 भागांना सील करण्यात आले आहे.

कारंज्यात प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांची ये-जा
कारंजा शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना प्रतिबंधित भागात खुलेआम लोकांची ये-जा सुरू आहे. या सर्व प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक कसे येत आणि जात आहेत, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दूधवाले सरळ आत जाताना आणि बाहेर येताना दिसतात.या प्रतिबंधित क्षेत्रात येथील लोकांची ये-जा वाढल्यामुळे शहरातील इतर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र प्रशासनाचा एकही कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्राच्या ठिकाणी तैनात नसल्यामुळे प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.