Washim Hijab controversy : विद्यार्थिनींने हिजाब घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला

author img

By

Published : Jul 18, 2022, 4:05 PM IST

Updated : Jul 18, 2022, 6:35 PM IST

muslim students were denied entry to the examination center for wearing hijab in washim

नीट परिक्षेदरम्यान ( NEET EXAM ) हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश ( Hijab wearing students ) नाकरल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय ( Matoshree Shantabai Gote College ) केंद्रावर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांत तक्रार दाखल ( Complain to Washim Police ) करण्यात आली आहे.

वाशिम- काल दि.17 जुलै रोजी NEET चा पेपर ( NEET EXAM ) घेण्यात आला. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला मात्र, वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय ( Matoshree Shantabai Gote College ) केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याने प्रवेश नाकारण्यात आला. चेहरा, हॉल टिकिट दाखविल्यानंतर देखील विद्यार्थिनींना बुरखा काढण्यास सांगण्यात आले. असा आरोप विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी वाशिम पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.

वाशिम हिजाबचा वाद

बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल - पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीट ( NEET ) चा पेपर घेण्यात आला होता. मात्र, इरम मोहम्मद जाकीर, अरिबा समन गझनफर हुसैन, यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी, सदस्यांशी गैरवर्तन केले. बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल. एवढंच नव्हे तर, भर रसत्यात हिजाब काढायला लावला असा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा- Monsoon Session Begin Today : देशासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा - पंतप्रधान; संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

चौकशी करून योग्य ती कारवाई करणार - पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला. नंतर बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. बराच वेळ वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकाचे वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठानेदार रफीक शेख हे करत आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांनी दिली आहे.


दरम्यान, राज्यात 17 जुलै रोजी नीटचा पेपर पार पडला. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे.मात्र, वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर हिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला ( Washim Hijab Controversy ) आहे. चेहरा व हॉल तिकीट दाखविल्यानंतर देखील त्यांना परीक्षा देऊ दिली नाही, असा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. त्याप्रकरणी वाशिम पोलिसांनीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Mla Rais Shaikh On Washim Hijab Controversy ) आहे.

अल्पसंख्याक समाजाला सुरक्षा - रईस शेख म्हणाले की, ही घटना निंदनीय आहे. सरकार बदलले आणि ही घटना घडली आहे. एक समाजाला त्रास देणारे आता बाहेर येतील. मी विधानसभेत सांगितले होते, अल्पसंख्याक समाजाला सुरक्षा दिली पाहिजे. मी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहे. ते तत्काळ कारवाई करतील, अशी मला अपेक्षा आहे. कारण परत अशा प्रकारे महाराष्ट्रात कोणतीही घटना घडणार नाही. त्या मुलींचा हक्क आहे, ती पाहिजेल त्या कपड्यांमध्ये जाऊ शकते, असेही आमदार शेख यांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण? - वाशिममधील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर नीट परिक्षेचा पेपर पार पडला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र, मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास सांगण्यात आले. तसा आरोप मुस्लिम विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी केला आहे. त्याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

'बुरखा काढा नाही, तर...' - पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन या विद्यार्थींसोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी गैरवर्तन केले. बुरखा काढला नाही तर कात्रीने कापावा लागेल. तसेच, रस्त्यावर हिजाब व बुरखा काढायला लावला, असा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे.

राजस्थानच्या कोटामध्येही वाद - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे रविवारी देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यावेळी कोटाच्या दादाबारी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मोदी कॉलेज सेंटरमध्ये रविवारी ड्रेस कोडवरून वाद झाला. चार मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून केंद्रात आल्या होत्या, त्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले. मात्र विद्यार्थिनींनी हिजाब काढण्यास नकार दिला. पोलिसांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले आणि ड्रेस कोडचा हवाला दिला, तरीही विद्यार्थींनी ते मान्य केले नाही. नंतर त्यांच्याकडून परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यास ती स्वत: जबाबदार असेल असे लेखी घेण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींना फक्त हिजाब घालण्याची परवानगी देण्यात आली.

नंतर देण्यात आला प्रवेश - परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थिनींना मुख्य गेटवर थांबवून हिजाब घालून जाण्यास मनाई करण्यात आली होती. प्रदीर्घ चर्चेनंतर निरीक्षकांना पाचारण करण्यात आले, त्यानंतर परीक्षेदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची जबाबदारी स्वत:वर राहील, असे लेखी स्वरूपात निरीक्षकांनी घेतले. विद्यार्थिनींनी ही बाब लेखी दिली, त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. परीक्षा दिल्यानंतर निकाल किंवा अन्य काही समस्या आल्यास त्यास ती स्वत: जबाबदार असेल, असे या हमीपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. हा संपूर्ण निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा असेल.

हेही वाचा- Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

Last Updated :Jul 18, 2022, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.