ETV Bharat / state

वाशिममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या ११०० गणेशमूर्ती

author img

By

Published : Aug 31, 2019, 8:46 AM IST

Updated : Aug 31, 2019, 3:12 PM IST

वाशिममधील राजस्थान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या ११०० गणेशमूर्ती साकारल्या आहे. त्यामधून त्यांनी पर्यावरणाला वाचवण्याचा संदेश दिला आहे. तसेच त्या मूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प सुद्धा केला आहे.

शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारताना विद्यार्थी

वाशिम - आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. त्यासाठीच वाशिममधील राजस्थान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या ११०० गणेश मूर्ती साकारल्या आहे. तसेच त्या सर्व मूर्तींची स्थापना देखील करण्यात येणार आहे. महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती सप्ताह अंतर्गत गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी या मूर्ती साकारल्या.

वाशिममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या ११०० गणेशमूर्ती

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीने पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. त्यासाठी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यात येत आहे. तसेच यासाठी बनवलेली शाडू मातीची मूर्ती पाण्यात देखील अगदी सहज विरघळते. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यासाठी मदत होते.

शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीनंतर पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोपटे भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्या रोपट्यांची लागवड करण्याचा संकल्पही देखील केला आहे. मातीपासून दुरावत चाललेल्या तरुणाईचे मातीशी बंध जोपासणारे पर्यावरणीय संस्कार आजच्या रासायनिक युगात खरच कौतुकास्पद ठरतात.

Intro:स्लग : वाशीम शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनविल्या 1100 बाप्पांच्या शाडुच्या मूर्ती.....

अँकर:- राज्यात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे.वाशीम मध्ये मात्र पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी तरुणाई पुढे येत असल्याचं चित्र आहे.प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीने अलीकडे पर्यावरणाला हानी पोचत असल्यामुळे विविध क्षेत्रामधून पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवीत आहेत.यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी शहरातील राजस्थान महाविद्यालयात शाडु मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित या कार्यशाळेत महाविद्यालयीन तरुण तरुणीनी तब्बल 1100 शाडुच्या गणेशमूर्ती तयार केल्या असून त्यांची प्रतिस्थापना करण्याचा संकल्प केला आहे....

व्हिओ : जिल्ह्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीने अलीकडे पर्यावरणाला हानी पोचत असतांनाच वाशीममधील राजस्थान महाविद्यालयात शाडु मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची या कार्यशाळेत महाविद्यालयीन तरुण तरुणीनी तब्बल ११०० शाडुच्या गणेशमूर्ती तायर केले जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडु मातीपासून बनविली मूर्ती कमी पाण्यातही सहज विरघळते. मातीपासुन दुरावत चाललेल्या तरुणाईला मातीशी बंध जोपासणारा राजस्थान महाविद्यालयाचा हा पर्यावरणीय संस्कार आज च्या रासायनिक युगात कौतुकास्पद आहे...

व्हिओ : शाडु मातीच्या गणेशमुर्ती निर्मितीनंतर पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोपटे भेट दिले असून त्या रोपट्यांची लागवड करण्याचा संकल्पही यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे.....Body:वाशीम शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनविल्या 1100 बाप्पांच्या शाडुच्या मूर्ती.....Conclusion:वाशीम शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनविल्या 1100 बाप्पांच्या शाडुच्या मूर्ती.....
Last Updated : Aug 31, 2019, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.