ETV Bharat / state

फादर्स डे स्पेशल : रक्ताचे नाते नसलेल्या 14 अंधांचे पितृत्व स्वीकारणारा बाप

author img

By

Published : Jun 20, 2021, 11:56 AM IST

A father who accepts the paternit
A father who accepts the paternit

पांडुरंग हे आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना, आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता- पाहता त्यांच्या झोपडीत १५ मुले जमा झालीत. या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंग यांचे ते आधार झाले आहेत.

वाशिम - स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर 14 मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत. त्यांच्या पालन - पोषणासह शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत.

14 अंधांचे पितृत्व स्वीकारणारा बाप
पांडुरंग हे आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना, आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता- पाहता त्यांच्या झोपडीत १५ मुले जमा झालीत. या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंग यांचे ते आधार झाले आहेत. या सर्वांनी आर्केस्टा काढला. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले. परंतु, अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने तीही वेळ निघून गेली. अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत.रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो. पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी व्यतीत करणारा बाप माणूस देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ह्य फादर्स डे निमित्त ईटीव्ही भारतचा सलाम

हेही वाचा - कोल्हापूर - यंदाही पन्हाळा-पावनखिंड मोहीम रद्द, शिवप्रेमीमध्ये नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.