ETV Bharat / state

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

author img

By

Published : May 13, 2021, 7:34 AM IST

वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असल्याने, रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत.

म्युकरमायकोसिस
म्युकरमायकोसिस ने महिलेचा मृत्यू

वाशिम - कोरोनाच्या संकटातून वाशिम जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट डोळ्यांवर परिणाम होत आहे. प्रसंगी म्युकर मायकोसिस आजारात रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत.

म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षणे

वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये कोरोनावर उपचार घेत, असलेल्या एका 62 वर्षीय महिलेच्या डोळ्यांची हालचाल होत नव्हती. असे निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दाखल घेत, त्यांच्या काही चाचण्या केल्या. त्या चाचणी अहवालातून त्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या महिलेला डॉक्टरांनी अकोल्याला जाण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा या महिलेचा मृत्यू झाला. 29 एप्रिलला ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. महिलेचा सीटी स्कोर 22 होता. काही दिवसानंतर या महिलेला म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षणेही दिसून आली, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

कोणाला होऊ शकतो हा आजार?

जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बरा होण्याकरिता बहुतांश रुग्णांना डॉक्टर स्टीरॉइड देत आहेत. मधुमेहाने आजारी असलेल्या रुग्णांना स्टीरॉइड दिले व त्यामुळे त्यांची रक्तशर्करा वाढली त्याचवेळी रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती खालावली तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येतो. रुग्णांच्या डोळ्यांवर या आजारात परिणाम होतो. रुग्णांचे डोळे निकामी होण्याचा धोका असतो.

हेही वाचा - पालघरच्या ग्रामीण भागातील रुग्णांची फरफट थांबणार, अलर्ट सिटीझन फोरमने दिल्या दुचाकी रूग्णवाहिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.