ETV Bharat / state

हिंगणघाट : पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येच्या प्रयत्न, वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देत असल्याचा आरोप

author img

By

Published : Aug 13, 2020, 8:05 PM IST

वर्धा : हिंगणघाट पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री याबाबत पत्नीला लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शिपायाच्या पत्नीने केला आहे. तसेच आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत सुद्धा शिपायाने आरोप आणि त्रास देत असल्याचे म्हटले आहे. केतन बावनेर असे पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेच ठाणेदार यांनी कारवाईचे केल्याने तो आरोप करत असल्याचे म्हटले आहे.  हिंगणघाट तालुक्यातील पोलीस ठाण्यात केतन बावनेर हा कार्यरत होता. बुधवारी रात्री घरी आला तेव्हा त्याने मागील काही दिवसांपासून ठाणेदार सत्यविर बंडीवार हे मानसिक त्रास देत असल्याचे पत्नीजवळ बोलून दाखवले. यावेळी रात्री झोपी जातांना त्याने झोपीच्या गोळ्या यासह काही विषारी औषध घेतले. ही बाब पत्नीच्या लक्षात येताच त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून यातही आरोप करण्यात आले आहेत. त्याचा पत्नीनेही तसे आरोप केले आहेत. या प्रकरणात तपास केला जाईल, यासह केतन बावनेर याचे बयान घेण्यात येईल.नेमके काय कारण आहे याचा तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली.   तर, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार केतन बावनेरहा मुख्यालयी होता. विनंती करून तो हिंगणघाटला आला. जून महिन्यात त्याचा आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला. हा प्रकार पाहता दोन्ही कर्मचाऱ्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला होता. यावर बुधवारी मुख्यालयी जॉईन होण्याचे आदेश निघाले होते. यामुळे तो आरोप करत असेल अशी प्रतिक्रिया ठाणेदार बंडीवार यांनी दिली.
हिंगणघाट

हिंगणघाट तालुक्यातील पोलीस ठाण्यात केतन बावनेर हा कार्यरत होता. बुधवारी रात्री घरी आला तेव्हा त्याने मागील काही दिवसांपासून ठाणेदार सत्यविर बंडीवार हे मानसिक त्रास देत असल्याचे पत्नीजवळ बोलून दाखवले. यावेळी रात्री झोपी जातांना त्याने झोपीच्या गोळ्या यासह काही विषारी औषध घेतले. ही बाब पत्नीच्या लक्षात येताच त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

वर्धा : हिंगणघाट पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री याबाबत पत्नीला लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शिपायाच्या पत्नीने केला आहे. तसेच आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत सुद्धा शिपायाने आरोप आणि त्रास देत असल्याचे म्हटले आहे. केतन बावनेर असे पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, ठाणेदार यांनी कारवाई केल्याने तो आरोप करत असल्याचे म्हटले आहे.

हिंगणघाट तालुक्यातील पोलीस ठाण्यात केतन बावनेर हा कार्यरत होता. बुधवारी रात्री घरी आला तेव्हा त्याने मागील काही दिवसांपासून ठाणेदार सत्यविर बंडीवार हे मानसिक त्रास देत असल्याचे पत्नीजवळ बोलून दाखवले. यावेळी रात्री झोपी जातांना त्याने झोपीच्या गोळ्या यासह काही विषारी औषध घेतले. ही बाब पत्नीच्या लक्षात येताच त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून यातही आरोप करण्यात आले आहेत. त्याचा पत्नीनेही तसे आरोप केले आहेत. या प्रकरणात तपास केला जाईल, यासह केतन बावनेर याचे बयान घेण्यात येईल.नेमके काय कारण आहे याचा तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली.

तर, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार केतन बावनेर हा मुख्यालयी होता. विनंती करून तो हिंगणघाटला आला. जून महिन्यात त्याचा आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला. हा प्रकार पाहता दोन्ही कर्मचाऱ्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला होता. यावर बुधवारी मुख्यालयी जॉईन होण्याचे आदेश निघाले होते. यामुळे तो आरोप करत असेल अशी प्रतिक्रिया ठाणेदार बंडीवार यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.