ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या गावात झालेल्या दगडफेकीत जवान जखमी

author img

By

Published : Feb 10, 2020, 4:28 PM IST

one police jawan injured stone pelting in daroda hinganghat
हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या गावात झालेल्या दगडफेकीत जवान जखमी

दारोडा येथील संतप्त नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. या दगडफेकीत त्याच्या छातीला आणि पाठीला मोठी इजा झाली. त्याला हिंगणघाट येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. तिचा मृतदेह दारोडा या तिच्या गावाला आल्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत राज्य राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाल्याने त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. रवी नेहारे (रा. नागपूर, एसआरपीएफ गट - 4) असे या जवानाचे नाव आहे.

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या गावात झालेल्या दगडफेकीत जवान जखमी

संतप्त नागरिकांनी केलेल्या या दगडफेकीमध्ये त्याच्या छातीला आणि पाठीला मोठी इजा झाली. तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने प्रकृती बिघडली आहे. मागील एक तासांपासून त्याची प्रकृती खराब असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना कळताच त्यांनी वाहन बोलावले. यानंतर या जवानाला हिंगणघाट येथे हलविण्यात आले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेला निश्चितच न्याय मिळेल - राज्यमंत्री बच्चू कडू

हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज (सोमवारी) आठव्या दिवशी तिची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे.

Intro:*वर्धा फ्लॅश*

- दारोडा गावात झालेल्या दगडफेकीत एसआरपीएफ जखमी...

- रवी नेहारे नागपूर srpf गट 4 चा कर्मचारी जखमी झाल्याने प्रकृतीत बिघाड...

- दगडफेक मध्ये त्याच्या छातीला आणि पाठीला मोठी इजा झाल्याने जखमी झाला...

- मागील एक तासांपासून त्याची प्रकृती खराब असल्याचे माहिती...

- अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांना कळताच वाहन बोलावून हिंगणघाट येथे उपचारासाठी आले हलविण्यात ...

- श्वास घेण्याला त्रास होत असल्याने प्रकृती बिघडली...Body:रवी नेहारे नागपूर srpf गट 4 चा कर्मचारी जखमी झाल्याने प्रकृतीत बिघाड, दगडफेक मध्ये त्याच्या छातीला इजा झाल्याने जखमी झाला, मागील एक तासांपासून त्याची प्रकृती खराब असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांना कळताच वाहन बोलावून हिंगणघाट येथे हलविण्यात आले. अशी सूचना, श्वास घेण्याला त्रास होत असल्याने प्रकृती बिघडली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.