ETV Bharat / state

वर्ध्यामध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून व्यक्तीची हत्या; जिल्ह्यातील दुसरी घटना

author img

By

Published : Jul 22, 2020, 8:49 AM IST

murder
वर्ध्यामध्ये जादूटोणा संशयातून व्यक्तीची हत्या; जिल्ह्यातील दुसरी घटना

वर्ध्यात आल्लीपु पोलीस ठाण्याअंतर्गत जादूटोणा-करणी केल्याच्या संशयावरून जागलीवर जाणाऱ्या वयोवृद्धाची हत्या करण्यात आली. यात या घटनेला पाच दिवस लोटत नाही तेच आज दुसरी घटना उघडकीस आली.

वर्धा - वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्याच्या वडनेर पोलीस ठाण्याअंतर्गत आजनगाव (बोंदुर्णी) शिवारात वयोवृद्धाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह चेहऱ्याची ओळख पटणार नाही, अशा पद्धतीने दगडाने ठेचून फेकून देण्यात आला. तपासादरम्यान मृतदेह नागपूर जिल्ह्यातील जामठा येथील व्यक्तीचा असल्याचे पुढे आले. रामभाऊ किसन नेवारे (वय-65) असे मृतकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी हिंगणा पोलिसात अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबियांनी नोंदवली असल्याचे सांगण्यात येत आहे. जादूटोणा संशयातून व्यक्तीची हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

आजनगाव (बोंदुर्णी) रस्त्यालगतच्या नाल्यात एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह संशयितरित्या ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल बेनिवार यांना दिसला. याची माहिती तत्काळ वडणेर पोलिसांना देण्यात आली. वडनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मृतदेहाचा चेहरा हा विद्रूप करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. खिशात मिळालेल्या एका कागदाच्या आधारावरून हा मृत व्यक्ती नागपूर जिल्ह्यातील जामठा शिवारातील असल्याचे पुढे आले. यात अधिक तपास केला असता हा व्यक्तीचे नाव रामभाऊ नवारे असून दोन दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाल्याचे तक्रार करण्यात आली. ही तक्रार हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत नोंदवण्यात आली होती.

हा व्यक्ती जनावरं चारत असताना त्याचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात चार संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. व्यक्तीची हत्या जादूटोणा व करणी केल्याच्या संशयावरून करून त्याला आजनगाव शिवारात फेकण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शक ठाणेदार आशिष गजभिये यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचारी अजय रिठे, अंकुश निचट, लक्ष्मण केंद्रे, मनोज धात्रक, राहुल गिरडे करीत आहेत.

जादूटोण्यावरून हत्येची दुसरी घटना -

वर्ध्यात आल्लीपु पोलीस ठाण्याअंतर्गत जादूटोणा-करणी केल्याच्या संशयावरून जागलीवर जाणाऱ्या वयोवृद्धाची हत्या करण्यात आली. यात या घटनेला पाच दिवस लोटत नाही तेच आज दुसरी घटना उघडकीस आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.