ETV Bharat / state

Big Crackdown on Prostitution : हिंगणघाटमध्ये वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई; अनेक महिन्यांपासून सुरू होता धंदा

author img

By

Published : Mar 23, 2023, 7:47 PM IST

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. हा व्यवसाय हिंगणघाट शहरातील निर्जनस्थळी नव्याने उभारण्यात आलेल्या न्यानो पार्कमधील एका घरी केला जात होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. दोन पुरुषांसह दोन महिलांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Big Crackdown on Prostitution
वर्धा येथील हिंगणघाटमध्ये वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई

वर्धा : या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झालेली असून, या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास शहरातील व शहर परिसरातील अनेक मोठे मासेदेखील पोलिसांच्या हाती लागण्याची मोठी शक्यता आहे. या व्यवसायात सहभागी महिला या मुंबईतल्या असल्याचे बोलले जात असून, अनेक राज्यातून विविध महिलांना बोलावीत हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. ठराविक ठरलेल्या ग्राहकांना प्रतिहप्त्याला मोबाईलवर नवीन देहविक्री करणाऱ्या मुलींचे फोटो पाठवीत हा व्यवसाय सुरू होता. ग्राहकांना मोबाईलवर नवनवीन मुलींचे फोटो पाठवत हा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता.

वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई : महिलांकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन पुरुषांसह दोन महिलांना आज दि. 23 मार्चला पोलिसांनी शहालंगडी रोडवर छापा घालून, रंगेहाथ अटक केली. या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झालेली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने ही कार्यवाही केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शहालंगडी भागातील नॅनो पार्क या वसाहतीतील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना गुप्तचर सूत्रांकडून प्राप्त झाली. त्याआधारे पोलिसांनी काल रात्री एक बनावट ग्राहक त्या घरी पाठविला. सदर बनावट ग्राहकाने रुपये दीड हजार रुपयांत सौदा ठरविला.

पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आवळल्या मुसक्या : त्यानंतर त्याने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांना सांकेतिक इशारा करताच पोलिसांनी सदर घरावर छापा टाकला. यावेळी या घरात दोन महिला व एक पुरुष आढळून आला. पोलिसांनी या दोन महिलांजवळून दोन मोबाईल किंमत 10 हजार, घरमालक यांच्याजवळून एक मोबाईल व 13 हजार 900 रुपये नगदी तसेच या वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येत असलेली 10 लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण 10 लाख 60 हजार रुपयांचा माल व दोन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या दोन महिलांपैकी एक २६ वर्षीय युवती ही वेस्ट नूर हॉस्पिटल कुर्ला (मुंबई) येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : Woman Namaz In Jama Masjid : मुंबईतल्या जामा मशिदीत महिला करणार नमाज पठण; अध्यक्षांचा पुढाकार

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.