ETV Bharat / state

मांडवा शिवारात बिबट्याची निर्घृणपणे शिकार; चारही पंजे आणि मुंडके नेले कापून

author img

By

Published : Dec 12, 2019, 11:40 PM IST

Leopard has been hunted in Mandawa Shiva
मांडवा शिवारात बिबट्याची निर्घृणपणे शिकार

वर्धा शहरालगतच्या मांडवा शिवारातील टेकडीवर नर बिबट्याची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. या घटनेची वन विभागाने नोंद करत शोधमोहीम सुरू केली.

वर्धा - शहरालगतच्या मांडवा शिवारातील टेकडीवर नर बिबट्याची निर्घृणपणे शिकार करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. यात बिबट्याचे चारही पाय आणि मुंडके कापून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतक्या निर्घृणपणे शिकार झाल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विभागाने घटनेची नोंद करत चौकशी सुरू करत शोधमोहीम सुरू केली आहे.

मांडवा शिवारात बिबट्याची निर्घृणपणे शिकार

वर्ध्यापासून 14 किमी अंतरावर असलेल्या मांडवा कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टेकडीवर बिबट्या अवयव नसलेल्या मृतावस्थेत काहींना दिसला. याची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी पोहचले. यावेळी प्राथमिक तपासणी करण्यात आली. बिबट्याचे मुंडके तसेच चारही पाय कापून नेल्याने शिकार झाली असल्याचे सांगितले जात आहे.

पाहिल्यांदाच वर्धा वनविभागाच्या परिक्षेत्रात अशाप्रकारे निर्घृणपणे शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे चौकशी करत परिसर पिंजून काढण्यात आला. चौकशी नंतर पंचनामा करत शवविच्छेदन डॉ. रेणुका दिवाळे, डॉ कल्पना गायकवाड, डॉ संजय बागल यांनी केले. लवकरच गुन्हेगारांना पकडून कारवाई केली जाईल, अशी माहिती वन्यजीव मानद कौशल मिश्रा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

घटनास्थळी बिबट्या मिळाला तिथे रक्त न मिळाल्याने दुसरीकडे हत्या करून तिथे फेकण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलीस डॉग पाचारण करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आली. हे काम एका व्यक्तीचे नाही. ज्या पद्धतीने अवयव कापण्यात आले तो नक्कीच सराईत असल्याचे बोलले जात आहे. पण, बिबट्याची कातडी तशीच असल्याने संशयाची सुई कुठे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

यावेळी वनविभागाच्या सहायक वनउपसरंक्षक तुषार ढमढेरे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड वन्यजीव मानद कौशल मिश्रा, क्षेत्र सहायक श्याम परडखे, उमेश शिरपूरकर, तसेच जलद पथकाचे कर्मचारी आदींनी प्रक्रिया पार पाडत बिबट्याला अग्नी दिला. पुढील तपास सुरू करण्यात आला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Intro:
mh_war_lepord_hunting_vis_byte_7204321

मांडवा शिवारात बिबट्याची निर्घृणपणे शिकार, चारही पंजे आणि मुंडके नेले कापून

वर्धा लगतच्या मांडवा शिवारातील टेकडीवर नर बिबट्याची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. यात बिबट्याचे चारही पाय आणि मुंडके कापून नेल्याची एकच खळबळ उडाली आहे. इतक्या निर्घृणपणे शिकार झाल्याने प्राणि मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात व विभागाने घटनेची नोंद करत चौकशी सुरू करत शोध मोहीम सुरू केली आहे.

वर्ध्यापासून 14 किमी अंतरावर असलेले मांडवा कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टेकडीवर बिबट्या अवयव नसलेल्या मृता अवस्थेत काहींना दिसला. याची माहिती मिळताच वन विभाग घटणास्थाळी पोहचले. यावेळी प्राथमिक तपासणी करण्यात आली. बिबट्याच मुंडके तसेच चारही पाय कापून नेल्याने शिकार झाले असल्याचे सांगितले जात आहे.

पाहिल्यांदाच वर्धा वनविभागाच्या परिक्षेत्रात अश्या प्रकारे निर्घृणपणे शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे चौकशी करत परिसर पिंजून काढण्यात आला. चौकशी नंतर पंचनामा करत शवविच्छेदन डॉ रेणुका दिवाळे, डॉ कल्पना गायकवाड, डॉ संजय बागल यांनी केले. लवकरचा गुन्हेगारांना पकडून कारवाई केेली जाईल अशी माहीती वन्य जीव मानद कौशल मिश्रा यांनी ईटीव्ही भारतला दिली.

यावेळी घटनास्थळी बिबट्या मिळाला तिथे रक्त न मिळाल्याने दुसरीकडे हत्या करून तिथे फेकण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलीस डॉग पाचारण करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आली. हे काम एका व्यक्तीचे नाही. तसेच ज्या पद्धतीने अवयव कापण्यात आले तो नक्कीच सराईत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पण बिबट्याची कातडी तशीच असल्याने संशयाची सुई कुठे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

यावेळी वन विभागाच्या साह्याक वनउपसरंक्षक तुषार डमढेरे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड वन्य जीव मानद कौशल मिश्रा, क्षेत्र सह्याक श्याम परडखे, उमेश शिरपूरकर, तसेच जलद पथकाचे कर्मचारी आदींनी प्रक्रिया पार पाडत बिबट्याला अग्नी देत जाळून टाकण्यात आले. पुढील तपास सुरू करण्यात आला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.


Body:पराग ढोबळे, वर्धा. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.