ETV Bharat / state

Rose Farming: फुलांच्या राजाची शेती; गुलाबाची शेती करून कमवले वर्षाला लाखो रुपये

महिलांच्या केसांमध्ये माळण्यासाठी असो किंवा कार्यक्रमात नेहमी गुलाबाच्या फुलांचा वापर असतो. गुलाब हे व्यापारी पिकातील फुल म्हणून ओळखले जाते. वर्धा येथील बबन ढोबाळे या शेतकऱ्याने गुलाबाच्या शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.

Rose cultivation
गुलाबाची लागवड
author img

By

Published : Mar 25, 2023, 11:27 AM IST

शेतीच्या उत्पन्नातुन शेतकरी लखपती

वर्धा: गुलाबाच्या फुलांचा आपण नेहमी वापर करतो. सध्याच्या परिस्थितीत शेती करणे कोणालाही परवडत नसले तरी आजही असंख्य शेतकरी शेतीलाच आपला मुख्य व्यवसाय मानत आहेत. त्यात निसर्गच्या लहरीपणाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर वारंवार संकट येते. त्यामुळे अवकाळी पावस, वादळ, ओला दुष्काळ अशा अनेक समस्येला समोर जाऊन शेतकऱ्याला आपली पिके तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपावे लागते. एवढे जपूनही त्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. त्यातूनच शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबवून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. परंतु काही असेही शेतकरी आहेत जे पारंपारिक शेतीला फाटा देत, शेतीमध्ये अभिनव उपक्रम करून आपले उत्पन्न वाढवत आहेत.

गुलाबाची लागवड: एखादा शेतकरी महिन्याला एक लाख रुपये महिना कमावतो असे जर सांगितले तर ते कोणालाही गंमत वाटेल. परंतु ही गंमत नसून वास्तव्य आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत येथील बबन ढोबाळे हे शेतकरी. बबन ढोबळे हे शेतकरी चिकित्सक असून त्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. बबन ढोबाळे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या शेतीमध्ये त्यांनी गुलाबाची लागवड केली आहे. बबन ढोबाळे यांनी एकदा गुगल वर सर्च करून गुलाबाच्या कलमा विषयी माहिती मिळविली.

एका दिवसाला मिळतात तीन हजार: पुण्यावरून ऑनलाइन रोपे मागवली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या 3200 कलमाची लागवड केली. पहिल्या पंधरा महिन्यानंतर त्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. यामध्ये रोजचा त्यांचा खर्च 500 रुपये आहे. म्हणजे 15000 रुपये महिन्याला त्यांचा खर्च आहे. ते रोज 20 किलो गुलाबाची फुले आपल्या शेतातून काढतात. त्यांच्या फुलांना अतिशय जास्त मागणी असल्याने ते प्रतिकिलो 150 रुपये प्रमाणे विकले जातात. म्हणजे एका दिवशी त्यांना 3000 रुपये मिळतात. महिन्याला 90 हजार ते एक लाख रुपये त्यांना कमाई होते. यामध्ये त्यांच्याकडे बाराही महिने मजूर वर्ग आहे. त्या मजुरांना बाकी दुसरे काम बघावे लागत नसल्याने हे मजूरही मोठ्या आनंदाने त्यांच्याकडे कामाला येतात. बाराही महिने तीनही ऋतूमध्ये त्यांच्या हाताला काम मिळत असल्याने त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करा: आज बबन ढोबाळे यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गुलाबाची लागवड केली जाते. त्यातून रोज ते तीन ते साडेतीन हजार रुपये ते कमावतात. यांची शेती ही जंगलाला लागून असून त्यात मोठी मेहनत करावी लागते. त्यामुळे त्यांच्या शेतीतून मिळणाऱ्या नफ्याला ते आपल्या कष्टाचे फळ मानत आहेत. असेच शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग जर आपल्या शेतीमध्ये केले तर त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे गुलाबाच्या शेतीत कोणत्याही प्रकारच्या वादळाचे किंवा कोणत्याही प्रकारच्या दुष्काळाचे कोणतेही सावट येत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसानही होत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे शिकले पाहिजे. जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून शेतकऱ्यांची प्रगती होईल.

हेही वाचा: Bahubali Hanuman Temple तळेगाव येथील प्राचीन बाहुबली हनुमान मंदिर नागरिकांचे श्रद्धास्थान जाणून घ्या मंदिराची अख्यायिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.