ETV Bharat / state

ऐन हिवाळ्यातही वर्ध्यात पावसाची हजेरी; पिकांना बसणार फटका

author img

By

Published : Dec 26, 2019, 6:14 PM IST

Heavy Rain in wardha during winter
ऐन हिवाळ्यातही वर्ध्यात पावसाची हजेरी

ऐन हिवाळी वातावरणात जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

वर्धा - जिल्ह्यातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणाने कमालीचा बदल जाणवत आहे. यातच रात्रीपासूनच काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. तर काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक तयार झालेल्या वातावरणाने सूर्याचे दर्शन झाले नाही. यामुळे सर्वत्र धुके पसरलेले आहे. या पावसाचा पिकांना फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच यामुळे भरदिवसा काळोख पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ऐन हिवाळ्यातही वर्ध्यात पावसाची हजेरी

आज (गुरुवार) सकाळी कारंजा, आर्वी, आष्टी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर देवळी, सेलू आणि वर्धा तालुक्यात तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला. यात ज्या भागात पाऊस झाले तिथे गारठा वाढला आहे.

हेही वाचा - जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!

ढगाळ वातावरणामुळे अनेकांना सूर्यग्रहण पाहता आले नाही. अनेक खगोलप्रेमी दुर्बीण घेऊन तयार होते. मात्र, अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सूर्यग्रहण पाहण्याची संधी हुकली. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. तर या ढगाळ वातावरणामुळे पिकांना सुद्धा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Intro:वर्धा

जिल्ह्यातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा सरी

वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने कमालीचा बदल जाणवत आहे. यातच रात्रीपासूनच काही भागात पावसाच्या सरी बरसला. तर काही भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अचानक तयार झालेल्या वातावरणाने सूर्याचे दर्शन झाले नाही. यामुळे सर्वत्र धुकं पसरलेले आहे. भरदिवसा काळोख पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आज सकाळी जिल्ह्याच्या कारंजा, आर्वी, आष्टी,हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी बरसल्यात. तर देवळी, सेलू आणि वर्धा तालुक्यात तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे थंडीजोर कमी झाला. यात ज्या भागात पाऊस झाले तिथे गारठा वाढला.

आज सूर्यग्रहण असल्याने अनेकांना सूर्यग्रहण पाहता आले नाही. अनेक खगोल प्रेमी दुर्बीण घेऊन तयार असतांना अचानक झालेल्याब दलामुळे आज ग्रहण पाहण्याची संधी हुकल्याने हिरमोड झाला. ढगाळ वातावरणामुळे पिकांना सुद्धा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.



Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.