अखेर बेशुद्ध करून पकडला बिबट्या, वर्धा वन विभागाची कारवाई

author img

By

Published : Oct 26, 2021, 1:05 PM IST

बेशुद्ध करून पकडला बिबट्या

वर्ध्याच्या सावंगी मेघे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातून बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास येथे काही लोकांना बिबट दिसल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर येथे रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले. दरम्यान, बिबटला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाने मोठी तयारी केली होती. यामध्ये पिंजऱ्यासह अन्य सहित्य घेऊन ही मोहीम राबवण्यात आली.

वर्धा - वर्ध्याच्या सावंगी मेघे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातून बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास येथे काही लोकांना बिबट दिसल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर येथे रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले. दरम्यान, बिबटला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाने मोठी तयारी केली होती. यामध्ये पिंजऱ्यासह अन्य सहित्य घेऊन ही मोहीम राबवण्यात आली.

माहिती देताना वन अधिकारी

यशस्वीपणे पार पडले रेस्क्यू ऑपरेशन

हा बिबट्या जवळपास दीड वर्षाचा असून त्याचे वजन 23 किलोच्या घरात आहे. ही मादी बिबट अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने शिकार शोधत असतांना भटकत होती. तसेच, शहराच्या परिसरात पहिल्यांदाच हा बिबट दिसून आला. दरम्यान, ही मोहीम सर्व वन अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने राबवण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - महापालिका, नगरपालिकेत सदस्य संख्या वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.