Wardha Minor Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता

author img

By

Published : Jan 14, 2022, 5:21 PM IST

Updated : Jan 14, 2022, 7:28 PM IST

Wardha Illegal Abortion Case

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात ( Illegal Abortion Case Wardha ) पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस आज पुन्हा खोदकाम ( Excavation In Wardha Kadam Hospital )सुरू केले आहे. दोन दिवसापूर्वी गॅस चेंबरमधून 11 कवट्या आणि 54 हाडे ( Bone Remains Found In Wardha ) मिळाली होती.

वर्धा - बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात ( Illegal Abortion Case Wardha ) पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस आज पुन्हा खोदकाम ( Excavation In Wardha Kadam Hospital ) सुरू केले आहे. दोन दिवसापूर्वी गॅस चेंबरमधून 11 कवट्या आणि 54 हाडे ( Bone Remains Found In Wardha ) मिळाली होती. आज पुन्हा गॅस प्लांट उपसण्याचे काम पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित उपसण्याचे काम सुरू असताना यात काय मिळून येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

आर्वी पोलिसांकडून गुन्हा दाखल -

या प्रकरणी आर्वी पोलिसांनी ( Arvi Police Register FIR In Illegal Abortion Case ) एक मोठी कारवाई केली आहे. आम्ही १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच 5 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती आर्वीचे पोलीस स्टेशन निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी दिली आहे. यापूर्वी १० जानेवारीला बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली होती. तसेच या रुग्णालयाच्या डॉ. रेखा नीरज कदम यांनाही प्रकरणानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर रेखा कदम यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण -

आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या आवारात भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडांचे अवशेष मिळाले ( Bone Remains Found In Wardha ) होते. हाडांचे अवशेष हे एका जुन्या गोबर गॅसच्या खड्यात मिळाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, आर्वी पोलिसांनी ( Arvi Police Station ) ९ जानेवारीला या प्रकरणात अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल केला. ३० हजार रुपये घेऊन गर्भपात केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पीसीपीएनडीटीच्या राज्य समितीच्या सदस्यांकडून पाहणी -

यासंदर्भात पीसीपीएनडीटीच्या राज्य समितीच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनासोबत रुग्णालय परिसरात जाऊन पाहणी केली. त्यानंतर वर्ध्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात रुग्णालयाकडे 12 आठवड्यापर्यंतचा गर्भपात करण्याचा परवाना आहे. पण यामध्ये हाड आणि कवट्या मिळून आल्याने हे गर्भपात 20 आठवड्यांवरील असल्याचे लक्षात येत आहे. यासोबत रुग्णालयात गर्भलिंगनिदानाच्या माध्यमातून लिंग माहीत करून गर्भपात केले जात असावे, या संशयाला वाव असल्याचे डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले आहे. कारण ज्यांना गर्भपात करायचा असतो ते 20 आठवडे वाट पाहत नसतात, म्हणजेच हाड तयार होण्यापूर्वीच गर्भपात करतात. त्यामुळे बेकायदेशीर गर्भात व्हावे, असा संशय आहे याचा तपास पोलीस करतील, असेही त्या म्हणाल्या. तसेच रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन ही अटकेतील महिला डॉ. रेखा कदम आणि पती डॉ. नीरज कदम यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. त्यांचा परवाना डिसेंबर 2021मध्ये संपला होता. त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. त्याला 5 जानेवारीला समितीने बैठकीत नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सामान्य जिल्हा रुग्णालयाच्या लीगला ॲडव्हायझर यांनी दिली असल्याचेही डॉ. आशा मिरगे यांनी माध्यमांना सांगितले.यामध्ये त्या अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी काढण्यात आली होती का? जर काढण्यात आली होती, तर त्यामध्ये F1 फॉर्म भरण्यात आला, तो भरल्यानंतर, त्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिली होती का? असेंही प्रश्न उपस्थित केले. सोनोग्राफी केल्याची कुठलीही माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - Actor Kiran Mane controversy : स्टार प्रवाह वाहिनीने चुकीबद्दल जाहीर माफी मागावी, अभिनेता किरण मानेच्या पाठिशी काँग्रेस -अतुल लोंढे

Last Updated :Jan 14, 2022, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.