ETV Bharat / state

वर्धा : काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी केले आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ

author img

By

Published : May 10, 2021, 9:06 PM IST

Updated : May 10, 2021, 10:25 PM IST

रणजित कांबळे यांनी केले आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ
रणजित कांबळे यांनी केले आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ

आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर अजय डवले यांना फोनद्वारे विचारणा केली. एकीकडे लॉकडाऊन असताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या शिबिरावर राजकारण करत आहे काय? असा प्रश्न आमदार कांबळेनी करत चाचणी शिबिराबद्दल आक्षेप घेतला. मात्र संतप्त झालेल्या आमदार रणजित कांबळे यांचा पारा चढला आणि बोलण्याच्या तोल सुटला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ करत धमकी दिली.

वर्धा - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. 8 मेपासून निर्बंध सुरू झाले असून 13 मेपर्यंत हे निर्बंध असणार आहे. या काळात देवळी मतदार संघातील नाचण गावात तपासणी शिबीरावरून वाद निर्माण झाला. यातच कॉंग्रेसचे माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे यांनी राजकरण करत आहे, असे म्हणत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे.

रणजित कांबळे यांनी केले आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ
वर्ध्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू असताना 9 मे रोजी नाचण गाव येथे कोरोना तपासणी शिबिर घेऊन आरटीपीसीआर तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर अजय डवले यांना फोनद्वारे विचारणा केली. एकीकडे लॉकडाऊन असताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या शिबिरावर राजकारण करत आहे काय? असा प्रश्न आमदार कांबळेनी करत चाचणी शिबिराबद्दल आक्षेप घेतला. मात्र संतप्त झालेल्या आमदार रणजित कांबळे यांचा पारा चढला आणि बोलण्याच्या तोल सुटला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ करत धमकी दिली. याच संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली. या क्लिपमध्ये आमदार कांबळे यांनी संबंधितांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी वर्धा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती वर्ध्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेत आरोग्य सेवा देत असतांना मानसिक मनोबल खचले आहे. यामुळे आमदारांवर कारवाई करण्याची मागणी डॉ. अजय डवले यांनी केली आहे.आमदार या प्रकरणावर काय म्हणाले

प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच अँटिजेन चाचणी होत असते. एकीकडे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांना नाचणगाव येथे शाळेच्या परिसरात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी शिबीर घेण्यात आले. शिबीर घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी तेथे नियमाचे उल्लंघन करून शिबीरात उपस्थित होते. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळच ग्रामीण रुग्णालय असतांना मग शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचे कारण काय, असा प्रश्न आमदार रणजित कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या स्थितीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर

Last Updated :May 10, 2021, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.