ETV Bharat / state

भाजप पदाधिकाऱ्यांना सत्कार सोहळा घेणे भोवले; गुन्हा दाखल

author img

By

Published : Jul 6, 2020, 11:29 AM IST

registered against BJP leader
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्कार सोहळा घेणे भोवले

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्कार सोहळा घेणे भोवले. भाजपचे नवनियुक्त प्रदेश सचिव राजेश बकाने यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्कार समारंभाची माहिती मिळताचा पोलिसांनी कार्यक्रमस्थळी जाऊन कारवाई करत कार्यक्रम बंद पाडला आहे.

वर्धा - विधानसभा निवडणुकीत बंडखोरीनंतर राजेश बकाने यांची नव्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदी निवड झाली. त्यानिमित्याने भाजप कार्यलयात बकाने यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने सत्कार सोहळ्यांचा त्यांना चांगलाच भोवला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मात्र, शहरात चांगलीच खळबळ निर्माण झाली. विशेष म्हणजे या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये शहराचे पदाधिकारी नगरपालिका उपाध्यक्ष, नगरसेवक यांचा समावेश आहे.

registered against BJP leader
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्कार सोहळा घेणे भोवले; गुन्हा दाखल
देवळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी कलेल्याने राजेश बकाने चर्चेत आले. शिवसेनेला सुटलेली जागा आणि नंतर घडलेल्या राजकारणांत त्यांना पुन्हा भाजपात स्थान राहिले. यात नव्याने पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणीत राजेश बकाने यांना सचिवपदी निवड करण्यात आली. याचाच आनंद भाजप कार्यकर्त्यांना झाल्याने चक्क जमावबंदी असताना थाटात सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मात्र हा सत्कार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आता भोवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने रामनगर पोलिसांनी जाऊन कार्यक्रम बंद करण्यास सांगितला. यामुळे अनेकांचा तीळपापड झाला. पण कोरोनाच्या काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याऐवजी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत कार्यक्रम घेण्यात आल्याने उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाली.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्कार सोहळा घेणे भोवले; गुन्हा दाखल
या कार्यक्रमाला भाजपचे आमदार पंकज भोयर यांच्यासह राजेश बकाने आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यात पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्यांनी रामनगर पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्याने भाजप कार्यलयात जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी हा धक्कादायक प्रकार दिसून आला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम आटोपता घेत बाहेर निघून गेले. यावेळी सत्कार सोहळ्यास बैठकीचे आयोजन असल्याचे भाजप पदाधिकारी सांगतात. हा अंतर्गत कार्यक्रम असल्याचेही ते सांगतात. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 13 जणांच्या नावांचा समावेश असून 35 ते 40 जण इतर अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात भाजप शहर अध्यक्ष पवन परियाल, नगरपालिका उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, माजी जीप सदस्य सुनीता ढवळे, मंजुषा दुधबडे, प्रशांत बुर्ले, नगरसेवक विरु पांडे, निलेश किटे, श्रीधर देशमुख, शीतल ठाकरे, गिरीष कांबळे, अशोक कलोडे यांच्या नावाचा समावेश आहे.
पोलिसांच्या सूचना असताना कार्यक्रमाचा अट्टाहास का?

कोरोनाचे भीतीचे सावट असताना सोशल डिस्टनसिंग आदी नियमाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन करता आहे. 14 दिवस कंटेन्मेंट झोन घोषित असताना आमदार पंकज भोयर यांनी घरात राहून नियमाचे पालन करण्याचा संदेश दिला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम घेऊ नये, असे सुचवले असताना कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास का करण्यात आला. यात आता इतर 35 ते 40 जणांमध्ये नेमके कोणाचे नाव पुढे येणार, याकडेही लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.