ETV Bharat / state

चोविस तासानंतर वणा, वर्धा नदीच्या संगमावर मिळाला अभयचा मृतदेह, दोघींचा शोध सुरू

author img

By

Published : Sep 3, 2019, 11:38 PM IST

Updated : Sep 4, 2019, 7:49 AM IST

मृत अभय

हिंगणघाट येथे हरितालिकेचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार जण नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामध्ये आतापर्यंत एक महिलेचा शोध लागला आहे, तर १० वर्षीय मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. उर्वरीत दोघींचा शोध पुन्हा सुरू आहे.

वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हरितालिकेच्या विसर्जनासाठी गेलेले चार जण नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती. अवघ्या काही तासातच रिया भगत या महिलेला काढण्यात यश आले. तब्बल २४ तासानंतर मंगळवारी १० वर्षीय अभयचा मृतदेह आढळून आला. मात्र, अद्यापही लहान मुलगी अंजना आणि महिला दिपाली बेपत्ता आहे.

हिंगणघाटमधील दुर्घटनेबाबत बोलताना आमदार समीर कुणावार

हिंगणघाटच्या घाटावरून वाहत गेलेल्या तिघांनाही शोधण्याची मोहीम एसडीआरएफच्या माध्यमातून सोमवारपासून बोटीच्या सहाय्याने सुरू करण्यात आली. याचबरोबर मासेमारी करणाऱ्या बांधवांनी ट्यूबच्या साहाय्याने शोध घेतला. मात्र, कुणाचाही शोध लागला नाही. अखेर सोमवारी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली.

शोधमोहीम मंगळवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली. वणा नदी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीला जाऊन मिळते. यामध्ये मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास १० वर्षीय चिमुकला अभयचा मृतदेह धानोरा मांढळी पुलाजवळच्या काही लोकांना दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या भागात शोधमोहिम राबवण्यात आली. त्यांनतर घटना स्थळापासून जवळपास ५० किमीवर अभयचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. मात्र, १३ वर्षीय अंजना आणि शेजारी राहणारी महिला दिपाली यांचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहिम राबवण्यात येणार आहे.

हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार स्वतः एसडीआरएफच्या बोटीत बसून शोधकार्यात सहभागी झाले आहेत. यावएळी त्यांनी कुटुंबियांना दुःख पचवण्यास बळ मिळो, अशी प्रार्थना केली. तसेच पावसामुळे शोधकार्यात अडचण निर्माण होत आहे. मात्र, लवकरच बाकी असलेल्या दोघींनाही शोधण्यात यश येईल, असे ते म्हणाले. मात्र, निवडणुका जवळ आल्याने केलेला हा खटाटोप तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

Intro:mh_war_01_searching_opration_vis1_7204321

बाईट- समीर कुणावर, आमदार हिंगणघाट.


24 तासाच्या शोध मोहिमेनंतर नदीत मिळाला अभयचा मृतदेह

- घटनास्थळपासून 50 किमी अंतरावर, चंद्रपूर जिल्ह्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीत मिळालं मृतदेह
- 13 वर्षीय अंजना आणि शेजारी दीपाली भटे मृतदेह बेपत्ताच

- वणा - वर्धा नदीत मिळाला मृतदेह

- आमदार समिर कुणावार शोध कार्यात घेतला सशभगी


- अंजना दिपाली च्या प्रेताचा शोध सुरू

सोमवारी गणरायाचं आगमनाच्या दिवशी हिंगणघाट येथील घटनेने दुर्दैवी घटनेने आनंद मावळला. हरितालिकेच्या विसर्जनासाठी गेले असता 10 वर्षीय अभय पाय घसरून नदी पात्रता पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेली बहीण आई आणि शेजारची महिला चौघेही बुडाले. यात रिया भगत हीला काही तासात काढण्यात यश आले. मात्र तिघे बेपत्ता असल्याने मागील 24 तासापेक्षा जास्त कालावधी लोटून शोध महिमेत आज अभयचा मृतदेह आढळला. मात्र आद्यप ही लहान मुलागी आणि एक महिलेचा मृतदेह बेपत्ता आहे.

हिंगणघाटच्या घाटावरून वाहत गेलेले तिन्ही मृतदेह शोधण्याची मोहीम एसडीआरएफच्या माध्यमातून काल पासून बोटीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. याच बरोबर मासेमारी करणाऱ्या बांधवांनी ट्यूबच्या साह्याने शोध घेतला पण मृतदेह आढळून आला नाही. अखेर सोमवारी अंधार पडल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली.

आज सकाळपासून ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. आज नदीचे विशाल पात्र पाहता पुढे जाऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वणा नदी वर्धा नदीला जाऊन संगम होते. यात आज चार वाजताच्या सुमारास 10 वर्षीय चिमुकल्या अभयचा मृतदेह धानोरा मांढळी पुलाजवळच्या काही लोकांना दिसल्याने याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. या भागात शोध मोहीम राबवत त्यांनतर घटना स्थळापासून जवळपास 50 किमीवर मृतदेह मिळाला.


पण त्यानंतर सायंकाळी उशिरा पर्यंत शोध मोहीम कायम होती. यामुळे अजूनही 13 वर्षीय अंजना आणि शेजारी राहणारी महिला जी यांना वाचवण्यासाठी धावली तिचा मृतदेह अजून मिळाला नाही. उद्या पुन्हा सकाळपासून शोध मोहीम सुरू राहील.

या मोहिमेत सकाळपासून हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर हे एसडिआरएफच्या बोटीत जाऊन या शोध मोहिमेत सहभाग घेतला. यावेंळी कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची बळ देवो अशी प्रार्थना केली. तसेच पाण्यामुळे अडचण होत आहे. पण शोध मोहीम सुरू आहे लवकरच पथकाला यश येईल असेही म्हणाले.

यात शोध मोहिमेत आमदार समीर कुणावर यांनी स्वतः बोटीत जाऊन शोध मोहिमेत सहभाग घेतला हे कौतुकास्पद आहे. पण निवडणुका जवळ असल्याने तर हा खटाटोप नाहीना अशीही चर्चा दुसरीकडे ऐकायला मिळत होती.






Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated :Sep 4, 2019, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.